तुमच्या-आमच्या आवडीचे पारले बिस्किट महागणार, पॅकेटचं वजन होणार कमी
Prices of Parle G products: बालपणी बिस्किट म्हटलं की सर्वात डोळ्यासमोर नाव येयचं ते म्हणजे पारले बिस्किटचं. सकाळी-सकाळी चहा सोबत हामखास पारले बिस्किट आवडीने आपण खायचो. पण आता हे बिस्किटच्या किंमतीत लवकरच वाढ होणार आहे. भारतातील आघाडीची FMCG कंपनी Parle G आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवणार आहे.
कंपनीने ब्रेड, बिस्किटे, रस्क, केक उत्पादने आणि स्नॅक्ससह अनेक उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ब्रिटानिया कंपनीनेही आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. कंपनीने गेल्या तिमाहीत ही घोषणा केली होती. ज्यामध्ये ब्रिटानियाने सांगितले की, कंपनीच्या अनेक उत्पादनांच्या श्रेणींमध्ये किंमती वाढवण्यात आल्या आहेत.

पार्लेजी कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये 5 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. रिपोर्टनुसार ही वाढ ब्रेड, बिस्किटे, रस्क, केक उत्पादने आणि स्नॅक्ससह विविध वस्तूंवर लागू होऊ शकते. किंमती वाढवण्याच्या कंपनीच्या निर्णयामुळे Parle-G ₹5 आणि ₹10 चे पॅक तसेच इतर लहान बिस्किटांसारख्या लोकप्रिय उत्पादनांचे पॅकच्या आकारानुसार वजन 5% ते 10% कमी होऊ शकतं.
पार्ले प्रॉडक्ट्सच्या मालकीचा बिस्किट ब्रँड हा भारतातील सर्वोच्च FMCG ब्रँड राहिला आहे. यावर्षी ब्रँड फूटप्रिंटनुसार, कांतार वर्ल्ड पॅनेलच्या भारतातील सर्वाधिक निवडलेल्या ग्राहक ब्रँडची वार्षिक रँकिंग. खरं तर, टॉप 10 ब्रँडपैकी सात देशांतर्गत कंपन्यांच्या मालकीचे आहेत.
ऑगस्ट 2024 मधील एका अहवालानुसार सुमारे 445 ब्रँडपैकी पार्ले 7.98 अब्ज CRP सह 12 वर्षांपूर्वी ब्रँड फुटप्रिंटच्या स्थापनेपासून अव्वल स्थानावर राहिले. यानंतर ब्रिटानियाचा क्रमांक होता, ज्याची CRP 7.93 अब्ज आहे. हे दोन्ही ब्रँड 6% आणि 16% ने वाढले.












Click it and Unblock the Notifications