चांदीचा 'रुपेरी' धमाका! 3 लाखांचा टप्पा पार; आता गुंतवणूक करणे फायद्याचे की जोखमीचे, वाचा सविस्तर!
Today Gold Silver rate : गेल्या काही काळापासून सुस्त वाटणाऱ्या चांदीने बाजारात असा काही वेग घेतला आहे की, मोठ्या गुंतवणूकदारांचेही डोळे विस्फारले आहेत. चांदीने प्रति किलो 3 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
या अभूतपूर्व दरवाढीमुळे आता सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न आहे: या वाढलेल्या किमतीत गुंतवणूक करावी का? की आता उशीर झाला आहे?, या विषयी जाणून घ्या सविस्तर..!

'गरिबांचे सोने' आता बनले 'तंत्रज्ञान धातू'
चांदीच्या किमती वाढण्यामागे केवळ दागिन्यांची मागणी हे एकमेव कारण नाही. चांदीचे स्वरूप आता बदलले आहे. विश्लेषकांच्या मते, चांदी आता केवळ मौल्यवान धातू राहिलेली नाही, तर ती एक 'टेक्नोलॉजी मेटल' बनली आहे. किमती वाढण्यामागची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
औद्योगिक क्रांती: सौर पॅनेल (Solar Panels), इलेक्ट्रिक वाहने (EV), सेमीकंडक्टर आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांमध्ये चांदीचा वापर अनिवार्य आहे. हरित ऊर्जेकडे जगाचा कल वाढत असल्याने चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे.
पुरवठ्याची कमतरता : नवीन खाणींमधून होणारे चांदीचे उत्खनन मंदावले आहे, मात्र मागणी मात्र झपाट्याने वाढत आहे. या तफावतीमुळे किमतीत मोठी वाढ होत आहे.
जागतिक अनिश्चितता : डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक भू-राजकीय स्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्यासोबतच चांदीकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत.
३ लाखांच्या स्तरावर गुंतवणूक करावी का?
जेव्हा एखादी मालमत्ता आपल्या उच्चांकी स्तरावर असते, तेव्हा त्यात संधी आणि जोखीम दोन्ही असतात. यावर तज्ज्ञांचे काय मत आहे, ते पाहूया.
१. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधी
ज्या गुंतवणूकदारांचा दृष्टीकोन ३ ते ५ वर्षांचा आहे, त्यांच्यासाठी चांदी अजूनही एक उत्तम पर्याय आहे. औद्योगिक मागणी पाहता भविष्यात हा धातू आणखी नवी शिखरे गाठू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
२. 'एसआयपी'चा मार्ग सर्वोत्तम
एकदम मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी चांदीमध्ये हप्त्या-हप्त्याने (SIP) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे किमतीत भविष्यात होणाऱ्या चढ-उतारांपासून संरक्षण मिळते आणि गुंतवणुकीची सरासरी (Averaging) चांगली होते.
३. नफा वसुलीची शक्यता
किमती ३ लाखांच्या वर गेल्या असल्याने, अल्पकालीन गुंतवणूकदार नफा वसुलीसाठी विक्री करू शकतात. यामुळे किमतीत तात्पुरती घट किंवा 'करेक्शन' येऊ शकते. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी संयम ठेवणे गरजेचे आहे.
गुंतवणुकीपूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी
- आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी ठराविक हिस्साच (उदा. ५-१०%) चांदीत ठेवावा.
- प्रत्यक्ष चांदी खरेदी करण्याऐवजी सिल्व्हर ईटीएफ किंवा डिजिटल चांदीचा विचार करा, ज्यामुळे साठवणुकीची चिंता उरणार नाही.












Click it and Unblock the Notifications