PPf interest rate: PPF मध्ये गुंतवणूक करा करोडपती व्हा! सरकारी स्किम 500 पासून सुरुवात, परतावा लाखात
PPf interest rate january march 2026 : नव्या वर्षात सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केल्यानुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी (जानेवारी-मार्च २०२६) पीपीएफवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच, आजही तुम्हाला ७.१% दराने करमुक्त व्याज मिळत राहणार आहे.

पीपीएफ ही सर्वोत्तम योजना का आहे?
पीपीएफला EEE दर्जा प्राप्त आहे. याचा अर्थ असा की..
- १. गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.
- २. मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त असते.
- ३. मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी एकूण रक्कमही टॅक्स-फ्री असते.
गुंतवणुकीचे गणित: ५०० रुपयांपासून सुरुवात, परतावा लाखांत!
पीपीएफमध्ये तुम्ही वर्षाला किमान ५०० रुपये तर कमाल १.५ लाख रुपये गुंतवू शकता. दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे 'चक्रवाढ व्याजाचा' (Compounding) मोठा फायदा मिळतो.पीपीएफ गुंतवणुकीचे महत्त्वाचे नियम
गुंतवणूक मर्यादा: वर्षाला किमान ५०० रुपये जमा करणे अनिवार्य आहे.
सुरक्षितता: ही योजना केंद्र सरकारद्वारे समर्थित असल्याने तुमची मुद्दल आणि व्याज दोन्ही १००% सुरक्षित आहे.
कालावधी: पीपीएफचा मूळ कालावधी १५ वर्षांचा असतो, परंतु तुम्ही ५-५ वर्षांच्या गटात तो पुढे वाढवू शकता.
बॅलन्सवर लोन: आपत्कालीन स्थितीत तुम्ही पीपीएफ खात्यावर कर्ज देखील घेऊ शकता.
१५ वर्षांची शिस्तबद्ध गुंतवणूक (वार्षिक १.५ लाख रुपये)
जर तुम्ही दरवर्षी दीड लाख रुपये पीपीएफमध्ये जमा केले, तर १५ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक २२.५ लाख रुपये होईल. पण, चक्रवाढ व्याजाच्या किमयेमुळे तुम्हाला व्याजापोटी तब्बल १८,१८,२०९ रुपये मिळतात. अशा प्रकारे १५ वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात अंदाजे ४०,६८,२०९ रुपये एवढी मोठी रक्कम असेल. हे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असते.
२. मध्यम गुंतवणूकदारांसाठी पर्याय (वार्षिक १ लाख रुपये)
अनेकजण दरमहा साधारण ८,३०० रुपये किंवा वर्षाला १ लाख रुपये गुंतवतात. अशा वेळी १५ वर्षांच्या कालावधीत तुमची स्वतःची गुंतवणूक १५ लाख रुपये होते. त्यावर ७.१% दराने सुमारे १२,१२,१३९ रुपये व्याज मिळते. मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण २७,१२,१३९ रुपये मिळतील. निवृत्तीच्या नियोजनासाठी हा एक सुरक्षित आणि मोठा फंड ठरू शकतो.
३. दीर्घकालीन गुंतवणुकीतून 'करोडपती' होण्याचा मार्ग (२० ते ३० वर्षे)
पीपीएफचा खरा फायदा १५ वर्षांनंतर मिळतो, कारण तेव्हा तुमची व्याजावर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम वेगाने वाढते.
२० वर्षांचा कालावधी: तुम्ही मॅच्युरिटीनंतर खाते ५ वर्षांसाठी वाढवले आणि १.५ लाखांची गुंतवणूक सुरूच ठेवली, तर २० वर्षांनंतर तुमचा फंड सुमारे ६६.५८ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.
३० वर्षांचा कालावधी: ३० वर्षांपर्यंत सातत्य राखल्यास हा फंड तब्बल १.५४ कोटी रुपयांच्या घरात जातो.












Click it and Unblock the Notifications