Post Office Scheme : किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला मिळेल मोठा परतावा, अशी करा गुंतवणूक
Post Office Scheme : अनेक लोक पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात परंतु त्यांना माहित नसते की, कोणत्या योजनेत गुंतवणूक करणे चांगले आहे.आता पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.9% ऐवजी 7.5 टक्के व्याज मिळेल.

अशा परिस्थितीत तुम्ही या योजनेत पैसे गुंतवून चांगले फायदे मिळवू शकता. तर चला आम्ही तुम्हाला त्यासाठी अर्ज कसा करायचा ते तुम्हाला सांगणार आहोत.
तुम्ही सुध्दया किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता
या स्कीममध्ये तुम्ही सिंगल किंवा जॉइंट अकाऊंट उघडू शकता. याशिवाय 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल त्याच्या/तिच्या नावावर किसान विकास पत्र घेऊ शकतो.अल्पवयीन मुलाच्या वतीने पालक अकाऊंट उघडू शकतात. अकाऊंट उघडताना, आधार कार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो, KVP अर्ज फॉर्म इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असू शकते.
अशी करु शकता गुंतवणूकीला सुरुवात
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत किमान रु 1000 आणि रु. 100 च्या मल्टीपल गुंतवणूक करू शकता.जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही आणि या योजनेअंतर्गत कितीही अकाऊंट उघडली जाऊ शकतात. याशिवाय तुम्हाला सिंगल आणि जॉइंट अकाऊंट उघडण्याचा पर्यायही दिला जातो. 7.5 टक्के असल्याने, आता या स्किममध्ये तुमचे पैसे केवळ 115 महिन्यांत दुप्पट होऊ शकतात.
या स्किममध्ये मिळतात या सर्व सुविधा
या स्कीममध्ये एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफरही करता येतात. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करण्याचे किमान वय 18 वर्षे आहे. लक्षात ठेवा किसान विकास पत्राचा लॉक-इन कालावधी 2.5 वर्ष म्हणजे (30 महिने) आहे. लॉक-इन कालावधीपर्यंत गुंतवणूकदार खात्यातून पैसे काढू शकत नाही.
जर तुम्हाला हे अकाऊंट बंद करायचे असेल तर याच्याशी काही नियम व अटी जोडल्या आहेत. अकाऊंटधारकाच्या मृत्यूनंतर सिंगल आणि जॉइंट अकाऊंट मुदतीपूर्वी बंद केली जाऊ शकतात. या योजनेशी संबंधित अकाऊंट कोणत्याही न्यायालयाच्या आदेशानंतर मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. पैसे जमा केल्यानंतर 2 वर्षे 6 महिन्यांनंतर अकाऊंट मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
या स्कीममध्ये अशी करा गुंतवणूक :
किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला त्याचा योग्यरित्या भरलेला फॉर्म पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सबमिट करावा लागेल. यासाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे. तुम्हाला आयडी आणि ॲड्रेस प्रूफ कॉपी (पॅन, आधार, मतदार आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट) सबमिट करणे आवश्यक आहे. यानंतर, कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, तुम्हाला पैसे जमा करावे लागतील. तुम्ही रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे जमा करू शकता. यानंतर तुम्हाला लगेच KVP प्रमाणपत्र मिळेल. तुम्हाला ते सुरक्षित ठेवावे लागेल कारण तुम्हाला ते मॅच्युरिटीच्या वेळी जमा करावे लागेल.












Click it and Unblock the Notifications