PM Kisan : शेतकऱ्यांनो आज येणार पीएम किसानचा 2 हजारांचा 21 वा हप्ता; तुमचे अकाउंट कसे तपासावे? वाचा
PM Kisan 21st Installment Today : देशभरातील कोट्यवधी शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) २१ वा हप्ता अखेर आज (१९ नोव्हेंबर २०२५) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे! कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने याची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बुधवारपासून या प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.

या घोषणेमुळे कोट्यवधी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, अनेकांच्या मनात चिंता देखील आहे. कारण, अपूर्ण ई-केवायसी (e-KYC), कागदपत्रांची कमतरता किंवा आधार लिंकिंगमधील चुकांमुळे यावेळी अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. तुमचा हप्ता आला आहे की नाही, हे कसे तपासायचे? तसेच, कोणती चार राज्ये या वितरणातून वगळली आहेत, हे जाणून घेणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे आहे.
आज दुपारी येणार २ हजारांचा हप्ता
ताज्या अपडेट्सनुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जमा होणार आहे. केंद्र सरकारने १४ नोव्हेंबर रोजी याबाबत घोषणा केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता (₹२०००) वितरित केला जाणार आहे. खास बाब म्हणजे आज दुपारी २ वाजता या हप्त्याचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.
'पीएम किसान'च्या लाभार्थ्यांनो 'हे' काम आधी करा
पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना या २१ व्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता नाही. तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत (उदा. आधार/नाव/बँक तपशील चुकीचा), त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
नमो शेतकरी सन्मान निधी (Namo Shetkari Samman Nidhi) कधी मिळणार?
पीएम किसानचा २१ वा हप्ता वितरित झाल्यानंतरच, महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता (८ वा हप्ता) वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होते. पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकार पात्र शेतकऱ्यांची यादी मागवते. त्यानंतर निधी मंजूर करून शासकीय निर्णय (GR) जारी होतो. सध्याच्या अंदाजानुसार, नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता डिसेंबर महिन्याच्या २० तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती (Status) तपासायची असल्यास, तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर(pmkisan.gov.in) जाऊन तपासू शकता.
-
Papmochani ekadashi 2026 wishes marathi पापमोचनी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश -
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत -
Eid ul fitr 2026 wishes marathi hindi: इदनिमित्त खास मराठी-हिंदी 20 शुभेच्छा संदेश वाचा आणि शेअर करा -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
इराण-इस्त्रायल युद्धावर RSSने मांडली भूमिका; सरकार्यवाह होसबळे यांनी मोदी सरकारचे केले समर्थन! -
Baramati Bypoll 2026 : सुनेत्रा पवार रिंगणात, पण 'बिनविरोध'ची शक्यता धूसर? जाणून घ्या नेमकं समीकरण -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
चांदीच्या दरात मोठी घसरण! इराण युद्धाच्या सावलीत किमती कोसळल्या; जाणून घ्या आजचे ताजे दर!










Click it and Unblock the Notifications