'हे' काम करा नाहीतर 31 डिसेंबरनंतर पॅनकार्ड होऊ शकते 'निष्क्रिय!' पॅन-आधार लिंक कसे कराल? जाणून घ्या
PAN-Aadhaar Linking Deadline Dec 31 : जर तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर तुमच्याकडे आता केवळ काही तासच शिल्लक आहेत. आयकर विभागाने जाहीर केल्यानुसार, ३१ डिसेंबर २०२५ ही पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत आहे. जर या मुदतीपर्यंत लिंकिंग प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड 'इनऑपरेटिव्ह' म्हणजेच अकार्यक्षम होईल. यामुळे तुमचे बँकिंग व्यवहार, आयटीआर भरणे आणि इतर महत्त्वाचे आर्थिक व्यवहार ठप्प होऊ शकतात.

पॅन लिंक न केल्यास काय होईल?
१ जानेवारी २०२६ पासून ज्यांचे पॅन लिंक नसेल, त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल.
- आयटीआर (ITR): तुम्ही तुमचे आयकर विवरणपत्र भरू शकणार नाही.
- बँक व्यवहार: ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करणे कठीण होईल. नवीन बँक खाते उघडता येणार नाही.
- गुंतवणूक: शेअर्स किंवा म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीवर मर्यादा येतील.
- दंड: मुदतीनंतर लिंकिंग करण्यासाठी १,००० रुपये लेट फी भरावी लागेल.
- टीडीएस : टॅक्स रिफंड मिळणार नाही आणि टीडीएस जास्त दराने कापला जाईल.
पॅन-आधार लिंक करण्याची सोपी पद्धत
- १. पोर्टलला भेट द्या: आयकर विभागाच्या अधिकृत www.incometax.gov.in पोर्टलवर जा.
- २. क्विक लिंक्स: होमपेजवर डाव्या बाजूला 'Link Aadhaar' या पर्यायावर क्लिक करा.
- ३. तपशील भरा: तुमचा १० अंकी पॅन नंबर आणि १२ अंकी आधार नंबर टाका.
- ४. पेमेंट: जर तुम्ही आधी दंड भरला नसेल, तर 'e-Pay Tax' द्वारे तिथे नमूद रक्कम भरा.
- ५. ओटीपी पडताळणी: आधारनुसार नाव आणि मोबाईल नंबर भरून ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी पूर्ण करा.
- ६. स्टेटस तपासा: प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 'Link Aadhaar Status' वर जाऊन लिंकिंग झाले की नाही याची खात्री करा.
More From
-
विश्वविजेत्या इंडियाचे 'बाप्पा'ला साकडे! सिद्धिविनायकाच्या चरणी T20 वर्ल्डकप ट्रॉफीसह गंभीर-सूर्या! -
अदानी समूहाचा मोठा निर्णय: देशात उभारणार 300 शाळा, 30 रुग्णालये; 60 हजार कोटींची गुंतवणूक -
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
Eid ul fitr 2026 wishes marathi hindi: इदनिमित्त खास मराठी-हिंदी 20 शुभेच्छा संदेश वाचा आणि शेअर करा -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
इराण-इस्त्रायल युद्धावर RSSने मांडली भूमिका; सरकार्यवाह होसबळे यांनी मोदी सरकारचे केले समर्थन! -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
Baramati Bypoll 2026 : सुनेत्रा पवार रिंगणात, पण 'बिनविरोध'ची शक्यता धूसर? जाणून घ्या नेमकं समीकरण -
चांदीच्या दरात मोठी घसरण! इराण युद्धाच्या सावलीत किमती कोसळल्या; जाणून घ्या आजचे ताजे दर! -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
weather update : महाराष्ट्राचा पारा 41.8 अंशांवर! आजपासून 'या' ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार








Click it and Unblock the Notifications