Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Online gaming apps मोठी बातमी! ऑनलाईन रमीचा खेळ खल्लास! या गेमिंग कंपन्यांना झटका! रिअल मनी सेवा बंद

Online gaming apps : केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगविरोधात आणलेल्या विधेयकानंतर आता बड्या, मात्तब्बर कंपन्यांना झटका बसला असून पैशांवरचा खेळ खल्लास झाला आहे. ड्रिम -11 नंतर आता ऑनलाईन रमी गेमप्ले सेवा बंद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर यासंदर्भात संदेश दिला आहे.

देशात ऑनलाईन गेमिंगमध्ये असंख्य लोकांचे पैसै बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत, या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने विधेयक आणत ऑनलाईन गेमिंग रियल मनी प्लॅटफाॅर्मवर टाच आणली आहे. यामाध्यमातून आर्थिक व्यवहारावर ऑनलाईन गेम आता खेळता येणार नाही कारण थोड्याच कालावधीत हा कायदा पास होणार आहे. त्यामुळे आता ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

Online gaming apps Ban Jhupi Probo Rummy Culture Apps

केंद्र सरकारच्या या कठोर पाऊलांमुळे ऑनलाइन गेमिंगच्या बेकायदेशीर उद्योगाला आळा बसेल आणि समाजामध्ये निर्माण होणारे गंभीर दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल तसेच अनेकांचे संसार उद्धवस्त होण्यापासून वाचतील, अशी अपेक्षा आहे.

Take a Poll

रमी कल्चरकडून मॅसेज...

रमी कल्चर वेबसाईटवर एक संदेश देण्यात आला आहे. त्यात म्हटले की, "बदलत्या कायदेशीर परिस्थितीमुळे, आम्ही रमीकल्चर अ‍ॅपवरील अ‍ॅड कॅश आणि गेमप्ले सेवा तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करत आहोत. प्लॅटफॉर्म धोरणांनुसार पैसे काढण्याची सेवा उपलब्ध राहतील. खात्री बाळगा, हे तुमचे पैसे आहेत, ते आमच्याकडे सुरक्षित राहतील. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि समजूतदारपणाबद्दल धन्यवाद."

हेही वाचा : Dream11 shut down : ड्रिम 11 अ‍ॅप विसरा! कंपनीने गुंडाळला गाशा, 28 कोटी युजर्स, तुमच्या पैशाचे काय?

या बड्या ऑनलाईन गेम्सला झटका

1. गेम्सक्राफ्ट - रम्मीकल्चर: मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, गेम्सक्राफ्टचे ऑनलाइन रम्मी अ‍ॅप रम्मीकल्चरने असेही म्हटले आहे की रोख रक्कम आणि गेमप्ले सेवा जोडण्याची सुविधा तात्पुरती उपलब्ध नाही. कंपनीने आर्थिक वर्ष 24 मध्ये एकूण 947 कोटींचा नफा नोंदवला आहे, तर तिचा ऑपरेटिंग महसूल 3,475 कोटी होता.

2. झुपी: रिअल-मनी गेमिंग प्लॅटफॉर्म झुपीने 21 ऑगस्ट रोजी घोषणा केली की ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील 'पेड गेम्स' तात्पुरते निलंबित करत आहे, परंतु प्लॅटफॉर्म पूर्णपणे कार्यरत राहील. कंपनीचे लुडो सुप्रीम, लुडो टर्बो, स्नेक्स अँड लॅडर्स आणि ट्रम्प कार्ड मॅनिया सारखे मोफत गेम सर्व वापरकर्त्यांसाठी मोफत उपलब्ध राहतील.

3. प्रोबो: ओपिनियन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रोबोनेही त्यांचे आरएमजी ऑपरेशन्स तात्काळ बंद करण्याची घोषणा केली. कंपनीने म्हटले आहे की हे पाऊल भारतातील नवीन ऑनलाइन गेमिंग बिलाच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आले आहे आणि पुढील सूचना येईपर्यंत ऑपरेशन निलंबित राहील.

ऑनलाईन गेम्स- 'खेळ' खल्लास! कायद्यातील प्रमुख तरतुदी वाचा

संपूर्ण बंदी: पैशाच्या खेळांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कोणताही खेळ जो पैशाशी संबंधित आहे, तो आता बेकायदेशीर मानला जाईल.

जाहिरातींवर बंदी: अशा खेळांची जाहिरात कोणत्याही माध्यमावर करता येणार नाही.

आर्थिक व्यवहारांवर निर्बंध: बँक आणि इतर पेमेंट प्रणाली अशा खेळांशी संबंधित कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत.

राष्ट्रीय गेमिंग प्राधिकरण स्थापन होणार!

एक नवीन प्राधिकरण स्थापन केले जाईल. हे प्राधिकरण कोणता खेळ पैशाचा आहे आणि कोणता नाही हे ठरवेल, नियमावली तयार करेल आणि तक्रारींचे निवारण करेल.

  • हे विधेयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करते.
  • अशा खेळांचे प्लॅटफॉर्म चालवणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ₹ 1 कोटीपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
  • जाहिरात करणाऱ्यांवर ₹50 लाखांचा दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जाईल.
  • पेमेंट प्रक्रिया करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ₹ 1 कोटी दंड होऊ शकतो.
  • पुन्हा-पुन्हा गुन्हा करणाऱ्यांसाठी शिक्षा आणि दंड दोन्ही दुप्पट होतील.
  • पोलिसांना मालमत्ता जप्त करण्याचा आणि वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार मिळेल. काही गुन्हे अजामीनपात्र असतील.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+