Dream11 shut down : ड्रिम 11 अॅप विसरा! कंपनीने गुंडाळला गाशा, 28 कोटी युजर्स, तुमच्या पैशाचे काय?
Dream11 shut down Real gaming operation : ऑनलाईन गेमिंग विधेयकाचे कायद्यात रुपांतर होत असल्याने आता ऑनलाईन गेमिंगसंदर्भात कडक कायद्यांची निर्मितीमुळे भारतात प्रचंड लोकप्रिय झालेले सर्वात मोठे फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम-११ चे भविष्य धोक्यात आले आहे. आता ड्रिम ११ अॅप आता बंद होण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी आता गाशा गुंडाळत असून ड्रायव्हर, मजुराने ४ कोटी जिंकले अशा बातम्या आता तुम्हाला ऐकायला मिळणार नाही.
मनी कंट्रोलच्या माहितीनुसार, ड्रीम११ अॅपची मूळ कंपनी ड्रीम स्पोर्ट्सने त्यांचा रिअल-मनी गेमिंग विभाग बंद केला आहे. याचे कारण म्हणजे संसदेत नवीन ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर झाले आहे, जे सर्व रिअल-मनी गेमवर पूर्णपणे बंदी घालते.

नवीन ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ काय आहे?
सरकारने ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या धोक्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत सादर केले, हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत संमंत झाले आहे. त्यामुळे आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग आणखीनच सोपा झाला आहे. या नवीन ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ नुसार, आता पैशाच्या सर्व ऑनलाइन खेळांवर, मग ते कौशल्यावर आधारित असोत वा नशिबावर, पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. हे विधेयक केवळ खेळांवरच नव्हे तर त्यांच्या जाहिरातींवर, आर्थिक व्यवहारांवर आणि संबंधित सर्व घटकांवर कडक निर्बंध आणणार आहे, आणि हेच कारण ऑनलाईन गेमिंगसंदर्भात पैशांचा खेळ करणाऱ्या ड्रिम -११ प्लॅटफाॅर्म आणि यासारख्या कंपन्यांच्या पथ्थ्यावर पडले आहे.
हेही वाचा : Online gaming apps मोठी बातमी! ऑनलाईन रमीचा खेळ खल्लास! या गेमिंग कंपन्यांना झटका! रिअल मनी सेवा बंद
ड्रीम - ११ वापरकर्त्यांच्या पैशाचे काय?
ड्रीम-११ अॅपवरील एका सूचनेनुसार, "ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल, २०२५" शी संबंधित अलीकडील हालचाली पाहता, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरील सर्व 'पे टू प्ले' फॅन्टसी स्पोर्ट्स स्पर्धा थांबवत आहोत. तुमच्या खात्यातील शिल्लक सुरक्षित आहे आणि तुम्ही ड्रीम११ अॅपमधून पैसे काढू शकता." असे म्हटले आहे.
मनीकंट्रोलने त्यांच्या वृत्तात म्हटले की, "ड्रीम स्पोर्ट्सचे सीईओ हर्ष जैन यांनी कर्मचाऱ्यांना अंतर्गत संदेश दिला व म्हटले की, कायदा लागू झाल्यानंतर हे कामकाज सुरू ठेवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. ऑन-रोल असो किंवा कंत्राटी, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना योजनेबद्दल माहिती देण्यात आली आहे. कंपनी आता तिच्या इतर व्हर्टिकलवर लक्ष केंद्रित करेल - फॅनकोड, ड्रीमसेटगो आणि ड्रीम गेम स्टुडिओ...
...म्हणून कंपनीला मोठा धक्का बसणार
नवीन ऑनलाइन गेमिंग बिल मंजूर होणे हे ड्रीम स्पोर्ट्सच्या जवळ येण्याचे लक्षण आहे. कारण कंपनीच्या ९०% पेक्षा जास्त महसूल ऐतिहासिकदृष्ट्या ड्रीम- ११ च्या सशुल्क फॅन्टसी स्पर्धांमधून आला आहे. आर्थिक वर्ष २४ मध्येच, प्लॅटफॉर्मने ₹९,६०० कोटींपेक्षा जास्त आर्थिक महसूल नोंदवला. याच काळात पुरुष क्रिकेट विश्वचषक होता. या कंपनीच्या ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह स्पोर्ट्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म फॅनकोड आणि ड्रीमसेटगो सारख्या वर्टिकलचे नफ्यातील योगदान ड्रिम -११ च्या तुलनेत खूपच कमी आहे, म्हणून ड्रीम -११ बंद झाल्याने कंपनीला किती मोठा धक्का बसू शकतो हे स्पष्ट होते.
२८ कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते
ड्रीम स्पोर्ट्सची स्थापना २००८ मध्ये हर्ष जैन आणि भावित शेठ यांनी केली होती. त्यांच्या ड्रीम११ अॅपने भारतातील फॅन्टसी स्पोर्ट्स मार्केटवर वर्चस्व गाजवले. त्यांचे २८ कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते होते.












Click it and Unblock the Notifications