Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काय सांगता! आता विना इंटरनेट करा UPI पेमेंट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

सध्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस पेमेंटचा अर्थात UPI चा वापर सर्वाधिक होत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी नागरिक सहज यूपीआय पेमेंट करतात. हे पेमेंट सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने होते.

ही व्यवहाराची प्रक्रिया सुरक्षित आहे. ग्राहक अवघ्या काही सेकंदात त्याची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा करतो. त्याला सोबत रोख रक्कम ठेवण्याची गरज पडत नाही. त्यातून वेळेची बचत होते. तर सहज सुलभ व्यवहार होत असल्याने यूपीआयचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यात अजून एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. ती म्हणजे विना इंटरनेट आता UPI पेमेंट करता येणार आहे. ते कसे हे जाणून घेऊया..!

How to make UPI payment without internet

यूपीआयचा वापर स्मार्टफोन धारकांनाच करता येतो, असा एक समज आहे. पण सरकारने अगोदरच बेसिक फोनचा वापर करणाऱ्यांसाठी सुद्धा युपीआय सुरू केलेय. म्हणजे विना इंटरनेटसुद्धा यूपीआयाच वापर करता येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यासाठी UPI 123Pay ही सुविधा सुरु केलीय. त्याआधारे साध्या मोबाईलवरून सुद्धा पेमेंट करता येईल. आता विना इंटरनेट UPI 123Pay च्या माध्यमातून 10,000 रुपयांपर्यंत व्यवहार करता येईल.

असा करा विना इंटरनेट व्यवहार

ज्या युझर्सकडे स्मार्टफोन नाही, ते IVR (Interactive Voice Response) च्या माध्यमातून व्हॉईस पेमेंट करू शकतात. त्यासाठी एका IVR क्रमांकावर कॉल करावा लागेल. त्यानंतर कीपॅडवरून योग्य पर्याय निवडून पेमेंट करावे लागेल.

प्रॉक्सिमिटी साऊंड-बेस्ड पेमेंट करता येईल. एका खास टोनद्वारे हे पेमेंट करता येईल. त्यासाठी फोनमधील POD चा वापर करता येईल. त्यानंतर कीपॅडवरून योग्य पर्याय निवडून पेमेंट करावे लागेल.

युझर मिस्ड कॉल देऊन पेमेंट करू शकतात. त्यासाठी तुम्हाला एका नंबरवर कॉल करावा लागेल. कॉल आल्यावर तुमचा UPI PIN टाकून व्यवहार पूर्ण करता येईल. या पद्धतीत किचकट वाटत असल्या तरी त्या सोप्या आणि सुटसुटीत आहेत. एकदा तुम्ही त्याचा वापर सुरु केला तर तुम्हाला सहज त्याचा वापर करता येईल आणि व्यवहार करता येईल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+