Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन कोण आहेत, भाजपमध्ये कधी आल्या? वाचा

मु्ंबई - देशाच्या अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारामन यांना एक सशक्त अर्थमंत्री म्हणून पाहीले जाते. त्या आज सातव्यांदा आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दिग्गज आणि रथी महारथी असतानाही अर्थ खात्यासारखे ताकदवान खाते निर्मला सीतारामन यांनी या टर्ममध्येही आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी ठरल्या.चला तर जाणून घेऊया सीतारामन यांच्याविषयी सर्वकाही.

मंत्रिमंडळात 2014 मध्ये सामिल

निर्मला सीतारामन् यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 ला झाला. या भारतीय राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. निर्मला सीतारामन् यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. 3 सप्टेंबर 2017 पासून ते 30 मे 2019 त्या भारताच्या संरक्षणमंत्री व 30 मे 2019 ते आतापर्यंत भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले आहे.

Nirmala Sitharaman Biography Age  Career  Origin Latest Update

कर्नाटकातून राज्यसभेवर

संरक्षणमंत्री पदाचा पदभार घेण्याआधी सीतारामन् यांनी अर्थ राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्या आधी, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे. कर्नाटकातून त्या राज्यसभेच्या सदस्याम्हणून निवडल्या गेल्या आहेत. निर्मला सीतारामन भारताच्या विद्यमान वित्त आणि कार्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून काम करत आहेत.

इंदिरा गांधीनंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री

सीतारामन 2014 पासून त्या भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. त्यांनी यापूर्वी भारताच्या संरक्षण मंत्री म्हणून काम केले होते, त्यामुळे भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री बनल्या आणि पहिल्या पूर्णवेळच्या महिला अर्थमंत्रीही. त्यांनी वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभारासह वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून काम केले आहे.

तामिळनाडूत जन्म, फॉर्च्युनकडून गौरव

फॉर्च्युनकडून निर्मला सीतारामन यांना भारतातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून स्थान दिले. तामिळनाडूतील मदुराई इथे निर्मला सीतारामन् यांचा जन्म झाला. त्यांचे वडील नारायणन् सीतारामन् आणि आई सावित्री आहेत. नारायणन् हे रेल्वेत नोकरीला होते. त्यामुळे निर्मला यांचे बालपण वेगवेगळ्या शहरांत गेले. त्यांचे शालेय शिक्षण मद्रास आणि तिरुचिरापल्ली येथे झाले.

तिरुचिरापल्ली येतील सीतालक्ष्मी रामस्वामी महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर पदवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून प्राप्त केली. त्यानंतर पीएच.डी.साठी प्रवेश घेतला होता.

भाजपमध्ये 2006 मध्ये प्रवेश

सीतारामन 2006 मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या आणि 2010 मध्ये त्यांची पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2014 मध्ये, त्यांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आले आणि जून 2014 मध्ये, त्यांची आंध्र प्रदेशमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली. 11 जून 2016 रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी भाजपने नामनिर्देशित केलेल्या 12 उमेदवारांपैकी ती एक होती. कर्नाटकमधून त्या राज्यसभेवर गेल्या.

2019 ला पहिला अर्थसंकल्प सादर केला

सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून पदभार स्वीकारला, 31 मे 2019 रोजी निर्मला सीतारामन यांची अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 5 जुलै 2019 रोजी भारतीय संसदेत त्यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला. कोविड-19 महामारी दरम्यान तिला कोविड-19 इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्सचे प्रभारी बनवण्यात आले.

फोर्ब्ज मासिकात पाचवेळा स्थान

निर्मला सितारामण यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने 2019 मध्ये प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान केला. फोर्ब्ज मासिकाच्या जगातील सर्वात बलवान 100 महिलांच्या यादीत सीतारामन यांनी सलग पाच वेळेस स्थान पटकावले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+