Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आयकरदात्यांना मोठा दिलासा, नवीन कररचनेत स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरुन 75 हजारांवर! लाखोंना फायदा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील लाखो करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीनुसार, आता 50 हजार रुपयांऐवजी 75 हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे.

आता 3 लाख ते 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के दराने कर भरावा लागेल. त्याच्या स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत.नवीन कर प्रणालीमध्ये मात्र, जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

New Income Tax System No Income Tax Up To 7 Lakh Budget 2024 Update


काय म्हणाल्या अर्थमंत्री

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये केली जाईल. यासोबतच कररचनेतही बदल करण्यात येणार आहेत. आता नवीन कर प्रणालीमध्ये 3 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर लागणार नाही.

जुन्या करप्रणालीत बदल नाही

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शनवर 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये केली आहे पण जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे जुन्या कर प्रणालीशी सुसंगत असलेल्या करदात्यांना फारस दिलासा मिळाला नाही.

असा आहे स्लॅब

  • 3 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंत 5 टक्के कर भरावा लागेल.
  • 7 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के दराने कर भरावा लागेल.
  • 10 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के दराने कर भरावा लागेल.
  • 12 ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के दराने कर भरावा लागेल.
  • 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के दराने कर भरावा लागेल
  • जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नवीन कर प्रणालीमध्ये काय विशेष आहे?

  • यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत नाही.
  • 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला शून्य कर मिळू शकतो.
  • तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करत नसल्यास, नवीन कर प्रणाली निवडली पाहिजे.

जुन्या कर प्रणालीमध्ये काय विशेष आहे?

  • तुम्ही गुंतवणूक, आरोग्य विमा, मुलांच्या शाळेची फी आणि घर भाड्याच्या खर्चावर कर सूट घेऊ शकता.
  • अशा परिस्थितीत, जर तुमचा पैसा या गोष्टींमध्ये गेला तर जुनी कर व्यवस्था तुमच्यासाठी योग्य असेल.
  • जुन्या कर पर्यायामध्ये तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत करमुक्त उत्पन्न मिळवू शकता
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+