मायक्रोसॉफ्टला 23 बिलियन डाॅलरचा फटका! आयटी आउटेजचा परिणाम, शेअरमुल्यही घसरले
तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टच्या आयटी आउटेजचा 'जगभरातील कंपन्यांवर लक्षणीय परिणाम' झाला असून मायक्रोसॉफ्टला 23 बिलियन डाॅलरचा फटका सहन करावा लागला आहे. मायक्रोसॉफ्टच्या स्टॉकची किंमत 0.71 टक्क्यांनी घसरली आहे.
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या सर्व्हरमधील बिघाडानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांतील हवाई सेवांवरही त्याचा परिणाम झाला.
ghg

'क्राउड स्ट्राइक'मुळे समस्या
सर्व्हरमधील बिघाड तसेच समस्येमुळे ब्रिटन, भारतासह अनेक देशांच्या एअरलाइन्स, बँकिंग यंत्रणा आणि शेअर बाजारांच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये ही समस्या 'क्राउड स्ट्राइक'मुळे आली असल्याचे सांगण्यात येत आहे. आयटीची दिग्गज मायक्रोसॉफ्टला तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे त्यांच्या शेअरच्या किमतीत 0.71 टक्के घट झाली आहे.
जगातील कंपन्यावर परिणाम
मायक्रोसॉफ्टची आयटी सिस्टम क्रॅश झाल्यानंतर अवघ्या काही तासांत कंपनीचे 18 अब्ज पाऊंड इतके नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. तर या समस्येनंतर जगातील कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होत आहे.
शेअरची किंमत घसरली
टेक जायंटच्या शेअरची किंमत 0.71% घसरली परिणामी कंपनीचे मूल्य काल बाजार बंद होऊन सुमारे 18 अब्ज पाऊंडने (23 अब्ज डाॅलर) कमी झाले. इन्व्हेस्टमेंट डेटा प्लॅटफॉर्म स्टॉकलाइटिक्सच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की मायक्रोसॉफ्टच्या शेअरची किंमत 443.52 डाॅलर (343.44 पाऊंड) च्या मुल्यावर बंद झाल्यानंतर आज, 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजून 09 मिनिटांनी 440.37 डाॅलर (341 पाऊंड) वर घसरली आहे.
जगातील कंपन्यांवर मोठा परिणाम
दिग्गज अॅपल कंपनीनंतर मायक्रोसॉफ्ट ही जागतिक स्तरावर सर्वात महत्वाची कंपन्यांपैकी एक आहे, तिचे बाजारमूल्य आयटी आउटेजपूर्वी 3.27 ट्रिलियन डाॅलर अर्थात (2.53 ट्रिलियन पाऊंड) नोंदवले गेले होते. स्टॉकलिटिक्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आघाडीच्या टेक दिग्गजांपैकी एक म्हणून, मायक्रोसॉफ्टसाठी या परिमाणातील आयटी आउटेजचा जगभरातील कंपन्यांवर महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहे.
टीव्ही चॅनेल अन्य सेवा विस्कळीत
"टीव्ही चॅनेल विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे, परंतु तांत्रिक बिघाडाचा थेट परिणाम मायक्रोसॉफ्टच्या बाजार मूल्यावरही झाला आहे, त्यामुळे आज सकाळीच 23 अब्ज डाॅलरचे नुकसान झाले आहे" असे या प्रवक्त्याने सांगितले. जगभरातील तंत्रज्ञान प्रणालींमध्ये मायक्रोसॉफ्टवर असलेला अवलंबित्व लक्षात घेता, कंपनीने कमी कालावधीत गमावलेले मूल्य परत मिळवायला हवे असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications