Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोन्याचा भाव गगनाला! शनिवारी किमतींनी ओलांडला नवा टप्पा; मुंबई, पुणे, नाशिकमध्ये 'एवढे' महागले सोने

Maharashtra Gold Rate Jan 10 2026 : जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमतीत शनिवारी (१० जानेवारी २०२६) मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,१५० रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर ५००% टॅरिफ लावण्याच्या दिलेल्या इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात खळबळ उडाली असून, गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती दिली आहे.

Maharashtra Gold Rate Jan 10 2026

१० जानेवारी २०२६: सोन्याचे शहरनिहाय ताजे दर (प्रति १० ग्रॅम)

१. पुणे

  • २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹ १,४५,३८५
  • २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): ₹ १,३३,९३८
  • १८ कॅरेट: ₹ १,०९,५८७

२. नाशिक

  • २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹ १,४५,३८५
  • २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): ₹ १,३३,९३८
  • १८ कॅरेट: ₹ १,०९,५८७

३. नागपूर

  • २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹ १,४०,४६०
  • २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): ₹ १,२८,७५०
  • १८ कॅरेट: ₹ १,०५,३४०

४. मुंबई

  • २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹ १,३९,३२०
  • २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): ₹ १,२७,७१०
  • १८ कॅरेट: ₹ १,०४,४९०

सोन्याचे भाव वाढले, तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम झाला?

१. ७५ टक्क्यांचा जबरदस्त परतावा

जर तुम्ही गेल्या वर्षी १ लाख रुपये सोन्यात गुंतवले असतील, तर आज त्या सोन्याची किंमत १ लाख ७५ हजार रुपये झाली आहे. म्हणजेच एका वर्षात तुमच्या पैशात पाऊणपट वाढ झाली आहे.

२. कॅशमध्ये किती फायदा झाला?

२४ कॅरेट सोन्याचा विचार केला, तर १० ग्रॅममागे (एक तोळा) थेट ५८,३५० रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सामान्यतः सोन्यातून वर्षभरात १० ते १२% वाढ अपेक्षित असते, पण यावेळी ती तब्बल ७५% झाली आहे.

३. इतर गुंतवणुकीपेक्षा सरस

एफडी (FD) मध्ये पैसे दुप्पट व्हायला १० वर्षे लागतात, पण सोन्याने केवळ एका वर्षात ५० टक्क्यांहून अधिक परतावा देऊन सर्वांना चकित केले आहे.

'ही' वाढ का झाली?

जागतिक स्तरावर युद्धाची परिस्थिती आणि आर्थिक अस्थिरता यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी आपला पैसा शेअर बाजारातून काढून सोन्यात गुंतवला आहे. जेव्हा जगात आर्थिक संकट येते, तेव्हा सोन्याचे महत्त्व वाढते आणि त्यामुळेच किमतीत ही विक्रमी वाढ दिसून येत आहे.

दरवाढीची मुख्य कारणे

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याददरात केलेली कपात आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून झालेली सोन्याची विक्रमी खरेदी यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. भारतातही लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी प्रचंड वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत दर कडाडले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+