Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! 1 डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त! विविध शहरातील नवे दर लगेच तपासा!

LPG Price Today 1 Dec 2025 : डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम विपणन कंपन्यांकडून सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी आली आहे. १ डिसेंबर २०२५ पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर (19 किलोग्रॅम) च्या किमतीमध्ये ₹१० ची कपात करण्यात आली आहे.

सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरचे दर घटले आहेत. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातही दरात ₹५ ची कपात झाली होती. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडर (14.2 किलोग्रॅम) च्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि ते पूर्वीप्रमाणेच स्थिर ठेवण्यात आले आहेत.

LPG Price Today 1 Dec 2025

व्यावसायिक (Commercial) सिलेंडरचे नवे दर (19 किलोग्रॅम) - १ डिसेंबर २०२५

दिल्ली : कपात : १०.०० रुपये, नवीन दर : १५८०.५०

मुंबई " कपात १०.०० रुपये, नवीन दर : १५३१.५०

कोलकाता : कपात : -१०.०० रुपये, नवीन दर : १६८४.००

चेन्नई : कपात १०.००, नवीन दर: १७३९.५०

लक्षात ठेवा: हे दर मुख्यत्वे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि औद्योगिक वापरासाठी असलेल्या व्यावसायिक सिलेंडरसाठी आहेत.

घरगुती सिलेंडरचे दर (14.2 किलोग्रॅम) - १ डिसेंबर २०२५

(१ ऑगस्ट २०२५ पासून लागू असलेले दर कायम)

  • दिल्ली, एलपीजी दर : ८५३.००
  • मुंबई, एलपीजी दर : ८५२.५०
  • पुणे, एलपीजी दर : ८५६.००
  • लखनऊ, एलपीजी दर : ८९०.५०
  • हैदराबाद, एलपीजी दर : ९०५.००
  • जयपूर, एलपीजी दर : ८५६.५०
  • पाटणा, एलपीजी दर : ९४२.५०
  • बंगळूर, एलपीजी दर : ८५५.५०

घरगुती (LPG) आणि व्यावसायिक (Commercial) सिलेंडरमधील फरक

  • घरगुती सिलिंडर : घरगुती वापरासाठीचे LPG सिलेंडर १४.२ किलोग्रॅम आणि ५ किलोग्रॅम वजनामध्ये उपलब्ध असतात. हे सिलेंडर प्रामुख्याने लाल (इंडेनसारख्या कंपन्यांचे) किंवा निळ्या/पिवळ्या रंगाचे असू शकतात.
  • व्यावसायिक सिलिंडर : याउलट, व्यावसायिक वापरासाठीचे सिलेंडर आकाराने मोठे असतात आणि ते १९ किलोग्रॅम, ४७.५ किलोग्रॅम आणि मोठ्या औद्योगिक गरजांसाठी ४२५ किलोग्रॅम (कट्टा) या वजनांमध्ये उपलब्ध असतात. व्यावसायिक सिलेंडरचा रंग बहुतांशी निळा असतो.
  • घरगुती LPG सिलेंडरचा उपयोग केवळ स्वयंपाकघरात सामान्य कुटुंबांना स्वयंपाक करण्यासाठी होतो.
  • याउलट, व्यावसायिक सिलेंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, कँटीन, बेकरी आणि अन्य मोठ्या प्रमाणात स्वयंपाक किंवा उष्णता आवश्यक असलेल्या औद्योगिक युनिट्समध्ये होतो. त्यांच्या वापरातील फरक आणि मोठी क्षमता यामुळे त्यांचे दर आणि नियमन भिन्न असते.
  • दर आणि सबसिडी (अनुदान)
  • घरगुती सिलेंडरच्या किमतींवर सरकारकडून सबसिडी (अनुदान) दिली जाते, ज्यामुळे पात्र ग्राहकांना या गॅससाठी कमी पैसे द्यावे लागतात. तथापि, व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींवर कोणतीही सबसिडी दिली जात नाही. त्यामुळे, त्यांच्या किमती पूर्णपणे बाजारभावावर आधारित असतात आणि त्या घरगुती सिलेंडरपेक्षा जास्त असतात.
  • व्यावसायिक सिलेंडरचे दर हे दर महिन्याला व्यावसायिक कारणांसाठी नियमितपणे बदलले जातात, तर घरगुती सिलेंडरचे दर तुलनेने स्थिर ठेवले जातात.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+