Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! दसऱ्याच्या एक दिवस आधीच झटका! LPG सिलिंडरचे दर 'एवढ्या' रुपयांनी वाढले!

LPG Price Hike : दसरा आणि दिवाळीच्या उत्साहात असतानाच एक मोठी खिशाला आग लावणारी बातमी आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा 'गॅस बॉम्ब' बाहेर निघाला आहे. १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आज महाग झाला आहे, ज्यामुळे हॉटेल्स आणि कंपन्यांच्या बजेटला मोठा फटका बसला आहे! ऐन सणासुदीच्या काळात ही भाववाढ आगामी भाववाढीच्या शक्यतांवर मोहर लावू शकते.

LPG Price Hike

किती रुपयांनी वाढले सिलिंडरचे भाव?

वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, आज ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य जनता आणि व्यावसायिकांवर महागाईचा बॉम्ब फुटला आहे. दशाहऱ्याच्या तोंडावर १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर प्रति सिलेंडर ₹१५.५० रुपयांनी महाग झाला आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Take a Poll

व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर

इंडियन ऑईल च्या आकडेवारीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे दिल्ली ते चेन्नईपर्यंतच्या महानगरांमधील दर बदलले आहेत.

शहर जुना दर (₹) नवीन दर (₹) वाढ (₹)
दिल्ली - ₹१५८०.०० ₹१५९५.५० ₹१५.५०
मुंबई - ₹१५३१.५० ₹१५४७.०० ₹१५.५०
चेन्नई - ₹१७३८.५० ₹१७५४.०० ₹१५.५०

महत्त्वाची गोष्ट!

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या, परंतु ऑक्टोबरमध्ये पुन्हा दरवाढ झाली आहे. याचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मोठ्या उद्योगांवर होणार आहे.

सामान्यांसाठी दिलासा: घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे!

१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. हे दर जुन्या दरांनुसारच कायम आहेत.

महानगरांमधील घरगुती सिलेंडरचे दर (₹ मध्ये)

शहर - दर (₹ मध्ये)

  • दिल्ली ₹८५३.००
  • मुंबई ₹८५२.५०
  • लखनऊ ₹८९०.५०
  • पुणे ₹८५६.००
  • पटना ₹९४२.५०
  • हैदराबाद ₹९०५.००
  • बेंगलुरु ₹८५५.५०
  • गाजियाबाद ₹८५०.५०

उज्ज्वला योजनेच्या महिलांसाठी मोठी 'दिवाळी' भेट!

उत्तर प्रदेशातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील १.८५ कोटी महिलांना दिवाळीपूर्वी, २० ऑक्टोबर पर्यंत मोफत गॅस सिलेंडर (रिफिल) देण्याची घोषणा केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' (PMUY) सुरू केली होती. गरीब कुटुंबातील महिलांना धुरापासून मुक्तता मिळवून स्वच्छ इंधन उपलब्ध करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

सहा महिन्यात सिलिंडरचे किती भाव झाले होते कमी?

मार्च २०२५ पासून १९ किलोच्या एलपीजी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत सातत्याने घसरण होत गेली. १९ किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर २२३ ते २२९ रुपयांनी घटले आहेत ही सहा महिन्यातील कपात आहे. पण त्यानंतर आज भाव पुन्हा साडे पंधरा रुपयांनी वाढले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+