नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका! गॅस सिलेंडर 'एवढ्या' रुपयांनी महागला; वाचा नवे भाव
Lpg commercial gas cylinder price hike 1 january 2026 : नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात होत असतानाच पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना महागाईचा मोठा धक्का दिला आहे. १ जानेवारी २०२६ पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (१९ किलो) किमतीत १११ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात गॅस स्वस्त झाल्यानंतर आता थेट शंभर रुपयांहून अधिक वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांचे बजेट कोलमडणार आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या (१४.२ किलो) किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

व्यावसायिक गॅस सिलेंडरचे (१९ किलो) नवीन दर
देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये आजपासून व्यावसायिक सिलेंडरसाठी खालीलप्रमाणे दर मोजावे लागतील.
- शहर नवीन दर (१९ किलो) वाढ (रुपये)
- दिल्ली₹ १,६९१.५० म्हणजे दिल्लीत १११ रुपयांनी वाढ झाली.
- मुंबई₹ १,६४२.५० म्हणजे १११ रुपयांनी वाढ झाली.
- कोलकाता १,७९५.०० म्हणजे १११ रुपयांनी वाढ
- चेन्नईत १,८४९.५० म्हणजे ११०.५० रुपयांनी वाढ
१. महत्त्वाची गोष्ट! म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या, परंतु ऑक्टोबरमध्ये पुन्हा दरवाढ झाली आहे.
२. हेही लक्षात घेण्यासारखे आहे की, डिसेंबरमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ₹१० ने कमी करण्यात आली होती.
३. नोव्हेंबरमध्ये देखील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ₹५ ने कमी करण्यात आली होती परंतु आज मोठी वाढ करण्यात आली आहे, नवीन किमती देखील आजपासून लागू झाल्या आहेत. याचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मोठ्या उद्योगांवर होणार आहे.
घरगुती सिलेंडरचे (१४.२ किलो) ताजे दर
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर असल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रमुख शहरांमधील दर खालीलप्रमाणे आहेत.
- पुणे: ₹ ८५६.००
- मुंबई: ₹ ८५२.५०
- नाशिक: ₹ ८५८.०० (अंदाजित)
- दिल्ली: ₹ ८५३.००
- लखनऊ: ₹ ८९०.५०
- पाटणा: ₹ ९४२.५०
व्यावसायिक विरुद्ध घरगुती सिलेंडर: फरक काय?
घरगुती सिलेंडर (१४.२ किलो): हा प्रामुख्याने घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जातो. यावर सरकारकडून ठराविक नियमांनुसार सब्सिडी (सवलत) मिळते.
व्यावसायिक सिलेंडर (१९ किलो): याचा वापर हॉटेल, बेकरी, कॅटरिंग आणि इंडस्ट्रियल युनिट्समध्ये केला जातो. यावर कोणतीही सब्सिडी मिळत नाही, त्यामुळे याचे दर घरगुती गॅसपेक्षा जास्त असतात.












Click it and Unblock the Notifications