Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Lakhpati Didi Yojana : महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार 20 लाखांचे कर्ज; असा घ्या लाभ

Lakhpati Didi Yojana : ग्रामीण भारतातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारची 'लखपती दीदी योजना' एक वरदान ठरत आहे. एनडीए सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या योजनेचा उद्देश केवळ महिलांना रोजगार देणे हा नसून, त्यांना उद्योजक बनवणे हा आहे. २०२६ पर्यंत ३ कोटी महिलांना 'लखपती' बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असून, याद्वारे महिलांना २० लाख रुपयांपर्यंतचे विनाहमी कर्ज आणि विशेष कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे.

Lakhpati Didi Yojana 2026

नेमकी काय आहे 'लखपती दीदी' योजना?

'गुड रिटर्न्स'नुसार, ज्या ग्रामीण महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न किमान १ लाख रुपये आहे, तिला तांत्रिक भाषेत 'लखपती दीदी' म्हटले जाते. जर एखाद्या महिलेची मासिक कमाई १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि ती सलग चार शेती हंगाम किंवा व्यापार चक्रापर्यंत कायम राहिली, तर तिला या श्रेणीत समाविष्ट केले जाते.

योजनेची मुख्य आकर्षणे आणि फायदे

१. विनाहमी २० लाखांपर्यंत कर्ज

महिलांना आपला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे, १.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सरकार व्याजात मोठी सवलत देते.

२. मोफत कौशल्य प्रशिक्षण

  • या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या आवडीनुसार विविध क्षेत्रांत प्रशिक्षण दिले जाते.
  • तांत्रिक कामे: एलईडी बल्ब बनवणे, प्लंबिंग, वीज उपकरणांची दुरुस्ती.
  • आधुनिक शेती: 'नमो ड्रोन दीदी' उपक्रमांतर्गत ड्रोन उडवणे आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण.
  • पारंपारिक उद्योग: शिवणकाम, विणकाम आणि हस्तशिल्प.

३. बचत गटांना आर्थिक मदत

स्वयं सहाय्यता गटांना सरकारकडून 'रिव्हॉल्व्हिंग फंड' (२० ते ३० हजार रुपये) आणि व्यवसाय विस्तारासाठी २.५ लाख रुपयांपर्यंतचा 'कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड' दिला जातो.

'या' योजनेच्या लाभासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे कोणती हवी?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यात अनिवार्य अट म्हणजे संबंधित महिला कोणत्याही अधिकृत स्वयं सहाय्यता गटाची सदस्य असणे आवश्यक आहे. ही योजना प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे.

आवश्यक कागदपत्रे काय लागतील?

  • आधार कार्ड
  • बचत गट सदस्यत्वाचे प्रमाणपत्र
  • बँकेच्या पासबुकची छायाप्रत
  • पासपोर्ट आकाराचे फोटो आणि चालू मोबाईल नंबर
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+