Jioने आणला सर्वात स्वस्त प्लॅन; फक्त एवढ्या रुपयात मिळणार 336 दिवस अमर्यादित कॉलिंग अन् बरंच काही
Jio's cheapest recharge plan : जिओ ग्राहकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. जिओच्या वतीने नेहमीप्रमाणे त्यांच्या ग्राहकांसाठी खास प्लॅन जाहीर करण्यात आला आहे. भारताची खाजगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी उत्तम प्लॅन सादर करत असते.
विशेष बाब म्हणजे, जिओच्या वतीने दीर्घ वैधतेचा रिचार्ज प्लॅन देखील दिला जातो. ज्यामध्ये तुम्हाला 336 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळतो. नेमका हा प्लॅन किती रुपयांचा आहे, किती स्वस्त आहे आणि यातून ग्राहकांना किती व कोणता फायदा मिळतो, याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत...!

336 दिवसांसाठी किती रुपये द्यावे लागणार?
दीर्घकाळ दिल्या जाणाऱ्या प्लॅनसाठी या प्लॅनची किंमत 1748 रुपये आहे आणि यामध्ये वापरकर्त्यांना पूर्ण 336 दिवसांची वैधता मिळते. हा व्हॉइस-ओन्ली प्लॅन आहे, म्हणजेच तुम्हाला त्यात इंटरनेट डेटा मिळणार नाही.
तथापि, त्यात एसएमएस सुविधा निश्चितपणे दिली आहे, वापरकर्ता एकूण 3,600 एसएमएस पाठवू शकतो. त्याचबरोबर, या प्लॅनसह तुम्हाला जिओटीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आदर्श आहे जे फक्त कॉलिंग आणि एसएमएस वापरतात आणि इंटरनेटची आवश्यकता नाही.
1748 रुपयात काय मिळणार सुविधा?
जर तुम्हाला 1748 रुपये खर्च करायचे नसतील, तर जिओचा आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे 448 रुपयांचा प्लॅन, ज्याची वैधता थोडी कमी आहे परंतु अमर्यादित कॉलिंग आणि 1000 एसएमएस देते. यामध्ये जिओटीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे.
व्होडाफोन-आयडिया (व्हीआय) 4,499 रुपयांमध्ये एक वर्षाच्या वैधतेचा प्लॅन देखील देते, ज्यामध्ये वापरकर्त्यांना दररोज 1.5 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. विशेष म्हणजे रात्री 12 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित रात्रीचा डेटा देखील उपलब्ध आहे.
वर्षभराच्या कटकटीतून सुटण्यासाठी जिओचा हा प्लॅन चांगला!
एअरटेलचा 4,000 रुपयांचा नवीन प्लॅन विशेषतः परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. तो काही एअरलाइन्समध्ये 5 जीबी आंतरराष्ट्रीय डेटा, 100 मिनिटे आंतरराष्ट्रीय कॉलिंग आणि 250 एमबी इन-फ्लाइट डेटा देतो. ई-सिम वापरकर्ते विमानतळावर पडताळणीसह थेट ते सक्रिय करू शकतात. जर तुमचे मुख्य लक्ष फक्त कॉलिंगवर असेल आणि तुम्हाला एकदा रिचार्ज करून वर्षभराच्या तणावातून मुक्ती मिळवायची असेल, तर जिओचा 1748 रुपयांचा 336 दिवसांचा प्लॅन तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो.












Click it and Unblock the Notifications