ITRभरण्याची अंतिम मुदत का वाढवावी लागली! या दिवसापर्यंत भरा इनकम टॅक्स रिटर्न, दंड वाचवा वेळ खूप कमी
ITR filing last date extended : आयटीआर भरण्याची १५ सप्टेंबर ही अंतीम मुदत होती, ती तर गेली पण आता काय करणार, असा विचार करुन दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नव्हे खूशखबरच आहे, जर तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर भरला नाहीतर काळजी करु नका, आयकर विभागाने इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अंतीम मुदत वाढवली आहे.
करदात्यांसाठी जरी ही बातमी मोठी असली तरीही वेळ मात्र फारसा हातात नाही, म्हणूनच आता पटकन आयटीआर भरा कारण दंडही वाचेल.

नवीन तारीख काय?
आयकर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत दुसऱ्यांदा वाढवली आहे. मात्र, ही वाढ फक्त एका दिवसासाठी आहे! आता ITR भरण्याची नवीन तारीख १५ सप्टेंबर २०२५ वरून १६ सप्टेंबर २०२५ झाली आहे. यापूर्वी, ITR भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ वरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली होती.
मुदतवाढीचे कारण काय?
आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करदात्यांनी पोर्टलमध्ये येत असलेल्या समस्या आणि तांत्रिक अडचणींबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. पोर्टल वारंवार धीमे चालत होते आणि अनेक करदात्यांना ITR दाखल करताना अडथळे येत होते. याच कारणांमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
पोर्टलच्या समस्या कायम
मुदतवाढ जाहीर करूनही अनेक करदाते आणि कर व्यावसायिक (CAs) नाराज आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आयकर विभागावर जोरदार टीका केली आहे. अनेकांनी तक्रार केली की, पोर्टलची उपयुक्तता वेळेवर तयार नव्हती आणि त्यात अनेक त्रुटी होत्या. तसेच युजर्संनी अनेक वर्षांपासून आयकर पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
KIND ATTENTION TAXPAYERS!
— Income Tax India (@IncomeTaxIndia) September 15, 2025
The due date for filing of Income Tax Returns (ITRs) for AY 2025-26, originally due on 31st July 2025, was extended to 15th September 2025.
The Central Board of Direct Taxes has decided to further extend the due date for filing these ITRs for AY… pic.twitter.com/jrjgXZ5xUs
नवीन आकडेवारी: किती ITR दाखल झाले?
१५ सप्टेंबरपर्यंत एकूण ७.३ कोटींहून अधिक ITR दाखल झाले आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडे जास्त आहे. तरीही अनेक लोक पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे आपले ITR दाखल करू शकले नाहीत.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications