Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ITR Filing 2025 : आयटीआर दाखल करण्यासाठी घाई नको, 15 जूनपर्यंत वाट बघा, काय आहे कारण? जाणून घ्या

ITR Filing 2025 : आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2024-25 आणि 2025-26 कर निर्धारण वर्षासाठी आयकर रिटर्न फॉर्म अधिसूचित केले आहेत. आयकर विभागाने या वर्षी एप्रिलच्या अखेरीस हे फॉर्म अधिसूचित केले. अशा परिस्थितीत करदात्यांची त्यांचे रिटर्न भरण्याची लगबग दिसुन येत आहेस मात्र कर विभागाने अद्याप रिटर्न भरण्यासाठीची प्रक्रीया अन् सुविधा जाहीर केली नाही. आता ही सुविधा कधी जाहीर होईल याची प्रतिक्षा आहे.

तर दुसरीकडे आयकर विभाग लवकरच रिटर्न भरण्यासाठीची सुविधा जारी करु शकते, अशी अपेक्षा आहे. मात्र करदात्यांना सल्ला असा दिला जात आहे की युटिलिटीज किंवा सॉफ्टवेअर/फॉर्म सक्रिय झाल्यानंतरही रिटर्न भरण्याची घाई करू नका.

ITR Filing 2025

रिटर्न भरण्याची का घाई करु नये, 15 जूनपर्यंत का वाट पाहावी?

आयकर रिटर्न भरताना, काही महत्त्वाची कागदपत्रे आपल्याला आवश्यक असतात. यामध्ये फॉर्म 16 आणि फॉर्म 16 अ सारखे टीडीएस प्रमाणपत्रांचा यामध्ये समावेश होतो. पगारदार व्यक्तींसाठी फॉर्म 16 हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यात टीडीएस कपातीची माहिती असते आणि ती सहसा नियोक्त्यांकडून 15 जूनपर्यंत जारी केली जाते. त्यामुळे 15 जूनपर्यंत रिटर्न भरणे टाळायला हवे असे तज्ज्ञ सांगत आहेत.

मिंट- हिंदीने एका तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंटंट यांनी इकॉनॉमिक टाईम्सद्वारे दिलेल्या सल्ल्याचा संदर्भ देत सांगितले की, 'जर एखाद्या करदात्याने जानेवारी ते मार्च 2025 (आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत) मिळणाऱ्या उत्पन्नावरील टीडीएसची माहिती न देता आयटीआर दाखल केला तर चुकीची माहिती देण्याची शक्यता वाढते.' या कालावधीत मिळालेल्या उत्पन्नाचे eTDS रिटर्न नियोक्ता किंवा देयकाने 31 मे 2025 पर्यंत दाखल करावे लागेल. त्यात उत्पन्नाची आणि त्यावर कापलेल्या कराची संपूर्ण माहिती असते.

15 जूनपर्यंत रिटर्न न भरल्यास काय होईल?

  • तज्ज्ञ सांगतात की, 15 जूनपर्यंत आयटीआर जर तुम्ही भरला नाही तर तुम्हाला अधिक अचूक माहिती भरता येईल आणि संभाव्य चुका टळतील.
  • यामुळे करविभागाची नोटीस तुम्हाला येणार नाही, कारण चुका असतील तर करविभाग नोटीस पाठवू शकतो.
  • जर तुम्ही 15 जूनच्या आत आयटीआर भरला तर चुकां होऊ शकतात पण त्यानंतरही तुम्हाला त्या चुका दुरुस्त करुन परत तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत सुधारित रिटर्न दाखल करावे लागू शकतो. वेट आणि वाॅच केला तर हा त्रासही तुमचा टळेल.
  • जर तुम्ही, ज्यासाठी अतिरिक्त वेळ आणि मेहनत लागेल. अशा परिस्थितीत, सर्व कागदपत्रे येईपर्यंत तुम्ही रिटर्न भरणे टाळावे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+