Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ITR Filing 2025 : सर्व कामे सोडा आयटीआर आधी भरा, आज शेवटची तारीख! चुकल्यास बसेल मोठा भुर्दंड!

ITR Filing 2025 Last Date Today 15th September : आयटीआर म्हणजे इनकम टॅक्स रिटर्न्स भरण्याची आज १५ सप्टेंबर २०२५ रोजी शेवटची तारीख आहे. जर तुम्ही आयटीआर भरला नसेल तर लवकरात लवकर आयकर विवरण पत्र भरा, जर तुम्ही आयटी रिटर्न्स भरला नाहीतर तुम्ही शेवटची संधी गमवाल आणि मग तुम्हाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

ITR Filing 2025 Last Date Today


आयटीआर भरण्यासाठी आज अखेरची संधी असल्याने आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. कारण आर्थिक वर्ष २०२४-२५ (कर निर्धारण वर्ष २०२५-२६) साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक व्यावसायिक संस्थांनी तांत्रिक अडचणींमुळे मुदत वाढवण्याची मागणी केली होती. मात्र, आयकर विभागाने ही मागणी फेटाळून लावत स्पष्ट केले आहे की, आता आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही.

Take a Poll

आयकर विभागाने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) द्वारे सांगितले आहे की, करदात्यांना मदत करण्यासाठी त्यांची हेल्पडेस्क टीम २४x७ कार्यरत आहे. त्यामुळे, शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळून लवकरात लवकर आपला रिटर्न भरा, असे आवाहन विभागाने केले आहे.

याआधी दिली आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ

यापूर्वी, ३१ जुलै २०२५ ही अंतिम मुदत होती, जी तांत्रिक कारणांमुळे १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली होती. ही वाढलेली मुदत आता संपत आहे.

आयटीआर भरला नाहीतर किती दंड भरावा लागेल?

जर तुम्ही आजच्या मुदतीपर्यंत रिटर्न भरला नाही, तर तुम्हाला कलम २३४F अंतर्गत दंड भरावा लागेल. जर तुमचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर हा दंड ५,००० रुपये असू शकतो. तुमचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, तुम्हाला १,००० रुपये दंड भरावा लागेल. उशिरा दाखल केलेले किंवा सुधारित रिटर्न ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत भरता येतील, पण या गोष्टी करण्यापेक्षा आपण आज वेळेत आयटीआर भरला तर तुम्ही संभाव्य समस्यांपासून आणि आर्थिक भुर्दंडापासून दुर राहू शकता.

आयटीआर सोप्या पद्धतीने भरण्याची ही आहे पद्धत

प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टल (incometax.gov.in) वर तुम्ही जा.
या पोर्टलवर तुम्ही सहजपणे तुमचा आयटी रिटर्न भरू शकता.
यासाठी तुमचा पॅनकार्ड नंबर (जो तुमचा युजर आयडी असतो) आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
योग्य तो फॉर्म व्यवस्थित रित्या भरा आणि रिटर्न सबमिट करा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+