Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ITR Filing 2025 : वेळेत आयटीआर न भरल्यास किती होतो दंड! जाणून घ्या आयटीआर कसा भरायचा? जाणून घ्या

ITR Filing 2025 How much penalty if you do not file IT return on time : आयटीआर म्हणजे आयकर परतावा भरण्यासाठी सर्वच जणांनी लगबग सुरु केली आहे. आयटीआर कधी भरायचा, आपण आयकराच्या कक्षेत येतो का, आपला टीडीएस कापला तर तो कुठे जमा होतो आणि कसा काढायचा हेही अनेकांना माहित नाही तर काहीजण मात्र वेळेत सर्व गोष्टी पार पाडतात.

आयटीआर भरु, भरु म्हणत शेवटची तारीख येते पण आपण आयटीआर भरतोच असे नाही. ऐनवेळी मग घाई अन् गडबड होते. अशा गडबडीत आपल्या हातून कधी काय चूक होईल हे सांगता येत नाही. मुळातः आयटीआर भरणे म्हणजे ठारावीक वेतन किंवा मानधनातून प्रत्येक महिन्याला कापलेली रक्कम जी आपल्याला आर्थिक वर्ष संपल्यानंतर आयटीआर भरल्यानंतर मिळते.

ITR Filing 2025

आपलीच कापलेली रक्कम काढण्यासाठी आपण जर अनास्था केली तर ते आर्थिकदृष्ट्या आपल्याला परवडणारे नाही तर दुसरीकडे आयटीआर निर्धारित तारखेत भरला नाही तर आपल्याला दंडही बसू शकतो ही झाली नियमांची गोष्ट.. मग आयटीआर वेळेत भरायला हवाच ना.. त्यामुळेच आम्ही आयटीआर वेळेत न भरल्यास काय होते आणि आयटीआर कसा भरायचा हे स्टेप-बाय-स्टेप सांगणार आहोत.

आयटीआर वेळत न भरल्यास काय होते?

गुड रिटर्ननुसार, जर तुम्ही देय तारखेच्या आत IT रिटर्न दाखल केले नाही, तर तुम्ही 31 डिसेंबर 2025५ पर्यंत उशिरा दंडासह रिटर्न दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. म्हणून, तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करणे चांगले होईल आणि संभाव्य नुकसानही टाळता येईल.

ITR भरण्यासाठीअंतीम तारीखेची मुदत वाढवली का?

गुड रिडर्न्सनुसार,आता 31 जुलै ऐवजी आयटीआरसाठी 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वेळ मिळणार आहे. या तारखेपर्यंत तथापि, ही सवलत सर्वांना देण्यात आलेली नाही. सरकारने अशा व्यक्तींना अतिरिक्त वेळ दिला आहे ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही. यामध्ये पगारदार लोक, पेन्शन मिळवणारे ज्येष्ठ नागरिक, परदेशात राहणारे भारतीय अनिवासी भारतीय (एनआरआय) यांना वेळ देण्यात आला आहे.

ITR ऑनलाईन कसा भरायचा? (स्टेप बाय स्टेप)

  • स्टेप 1 - आयकर ई-फायलिंग वेबसाइटवर नोंदणी करा किंवा लॉग इन करा.
  • जर तुम्ही आधीच नोंदणी केलेली असेल तर तुमचा युजर आयडी (जो तुमचा पॅन आहे), पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून लॉग इन करा.
  • जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर 'नोंदणी करा' टॅबवर क्लिक करा आणि सूचनांचे पालन करून तुमची नोंदणी पूर्ण करा.

हेही वाचा : ITR भरल्यानंतर किती दिवसांत मिळतो रिटर्न! अनेकांना वेळेत का मिळत नाही परतावा? जाणून घ्या सर्व

  • स्टेप 2 - 'फाइल इन्कम टॅक्स रिटर्न' पर्यायावर जा लॉग इन केल्यानंतर, डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडेल.
  • 'e-File' मेनूवर क्लिक करा.
  • ड्रॉपडाउन मेनूमधून 'Income Tax Returns' निवडा.
  • नंतर 'File Income Tax Return' वर क्लिक करा.
  • यामुळे रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न पेज रि-डायरेक्ट होईल, जिथे तुम्ही आवश्यक तपशील भरण्यास सुरुवात करू शकता.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+