Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ITR भरल्यानंतर किती दिवसांत मिळतो रिटर्न! अनेकांना वेळेत का मिळत नाही परतावा? जाणून घ्या सर्व

Income Tax Return Filing ITR When do get Return : आयटीआर भरण्याचा हा काळ आहे. पंधरा जूनपासून आयटीआर भरण्यासाठी अनेकांची लगबग सुरु झाली आहे, तर काहीजणांनी आयटीआर अर्थात इनकम टॅक्स रिटर्न भरला आहे. आता प्रतीक्षा आहे ती आयकर रिटर्न कधी मिळतो याची...

आयकर रिटर्न काही जणांना लवकर मिळतो तर काही जणांना रिटर्न मिळण्यास विलंब होतो. याचे कारण काय आणि आयकर भरल्यानंतर कधी मिळतो रिटर्न हे आज आपण जाणून घेऊया.

Income Tax Return Filing ITR When do get Return

काय आहे IIR ची प्रक्रीया..? (Income Tax Return Filing)

जर तुम्ही आयकर रिटर्न भरला असेल तर येथे तुमचे काम संपले आहे, आता जे काम करेल ते आयकर विभागच करणार आहे. आयकर रिटर्न भरल्यानंतर अनेकांना प्रतीक्षा असते की, कधी रिटर्न मिळेल, हे पैसे लवकर मिळावे ही अनेकांची अपेक्षा असते.

ITR दाखल केल्यानंतर, प्राप्तिकर विभागाकडून मंजुरीची वाट पहावी लागते. आयकर विभाग तुमच्या आयटीआरवर प्रक्रीया करते तसेच पडताळणी करते या कालावधीपर्यंत तुम्हाला परतावा मिळत नाही. मंजुरी येईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागते.

ITR दाखल केल्यानंतर तुम्हाला परतावा कधी मिळतो?

गेल्या वर्षी, स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, तंत्रज्ञानाच्या मदतीने आता आयकर परतावा लवकर मिळत आहे. 2013-14 मध्ये, परतावा मिळण्यासाठी सरासरी 93 दिवस लागत होते, परंतु आता ही वेळ सुमारे १० दिवसांवर आली आहे.

असे असले तरीही प्रत्येकाला 10 दिवसांत परतावा मिळत नाही, हा फक्त सरासरी वेळ आहे, हमी नाही असेही सितारामन यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. म्हणजेच आयकर मिळण्यासाठी किमान दहा दिवस लागतात तर आपण आता कमाल मर्यादा बघुया.

तज्ज्ञांच्या मते, सामान्यतः ITR दाखल केल्यानंतर 20 दिवसांनी परतावा येऊ लागतो. परंतु नियमांनुसार, कर निर्धारण वर्ष संपल्यानंतर 9 महिन्यांच्या आत कधीही परतावा मिळू शकतो. आता जाणून घेऊया की, तुमचा परतावा का अडकतो..

तुमचा परतावा का अडकतो, कारणे काय?

  • परतावा अडकण्याची अनेक कारणे असू शकतात. फक्त आयकर रिटर्न भरणे पुरेसे नाही.
  • तुम्हाला ते ई-व्हेरिफाय करावे लागेल. जोपर्यंत तुम्ही आयटीआर ई-व्हेरिफाय करत नाही तोपर्यंत रिटर्न प्रक्रिया केली जाणार नाही.
  • ई-व्हेरिफिकेशननंतर, परतावा सहसा 4-5 आठवड्यांत येतो.
  • जर तुमचा पॅन आधारशी लिंक नसेल, आयकर विभागाने पाठवलेल्या ईमेल किंवा सूचनांना प्रतिसाद तुम्ही दिला नाही आणि टीडीएसमध्ये त्रुटी किंवा तुमचा बँक खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड चुकीचा असेल तर तुमचा रिटर्न अडकू शकतो.

हेही वाचा : ITR filing 2025: आयटीआर भरण्याची तारीख वाढली! आता या तारखेपर्यंत भरु शकता रिटर्न, कुणाला मिळाली सवलत

हेही वाचा : ITR Filing: आयटीआर भरण्याची शेवटच तारीख कधी आहे; काय कागदपत्रे लागतात, रिटर्न्स कधी मिळेल? वाचा सर्व

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+