खूशखबर! iPhone 17 लाँच होताच iPhone 16 अन् आयफोन -15 झाले स्वस्त! येथे तपासा कमी झालेल्या किमती
iPhone 16 and iPhone 15 became so cheap : सामान्यांपासून धनदांडग्यांपर्यंत आयफोनची सर्वांनाच भुरळ आहे. आता प्रत्येक सेगमेंटमधील आयफोन स्वस्तः होत आहेत, यापुर्वी नवीन लाँचिंगआधी त्याखालील सीरीजचे आयफोन स्वस्त झाले होते, आता आयफोन चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
आयफोन १७ लॉन्च होण्यापूर्वी आयफोन १६ आणि आयफोन १५ स्वस्त झाले आहेत. ही खूशखर आयफोन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा फायदा देणारी ठरणार आहे.

ऍपलचा नवीन आयफोन १७ (iPhone 17) बाजारात लवकरच येणार आहे. साहाजिकच ग्राहकांना आता आयफोन १६ (iPhone 16) आणि आयफोन १५ (iPhone 15) पुर्वीच्या तुलनेत स्वस्त फोन मिळणार आहे, कारण या आयफोनच्या किमतीत मोठी घट झाली आहे. ज्यांना कमी बजेटमध्ये आयफोन खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
ऍपल नेहमीच नवीन मॉडेल लॉन्च झाल्यावर जुन्या मॉडेल्सच्या किमती कमी करते. लवकरच फ्लिपकार्टची 'बिग बिलियन डे' सेलही सुरू होणार आहे, ज्यामुळे या फोनच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
नवीन किमती आणि खास वैशिष्ट्ये
आयफोन १५ (iPhone 15):
किंमत: १२८ जीबी व्हेरिएंट ॲमेझॉनवर ५९,९०० रुपयांना उपलब्ध आहे.
सवलत: लॉन्चवेळी याची किंमत ७९,९०० रुपये होती, म्हणजे जवळपास २०,००० रुपयांची थेट सवलत मिळत आहे.
अतिरिक्त ऑफर्स: ॲमेझॉन एक्सचेंज ऑफर देत आहे, ज्यात जुन्या फोनच्या चांगल्या स्थितीनुसार ४२,००० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. तसेच, नो-कॉस्ट EMI चा पर्यायही उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये: यामध्ये ४८एमपी (48MP) २एक्स टेलिफोटो कॅमेरा आणि ए१६ बायोनिक (A16 Bionic) चिपसेट आहे.
टीप: यात ऍपल इंटेलिजन्स (Apple Intelligence) फीचर्स उपलब्ध नाहीत.
आयफोन १६ (iPhone 16):
किंमत: सध्या आयफोन १६ ॲमेझॉनवर ६९,९९९ रुपयांना मिळत आहे.
सवलत: लॉन्चवेळी याची किंमत ७९,९९९ रुपये होती, म्हणजेच १०,००० रुपयांची सरळ सवलत आहे.
अतिरिक्त ऑफर्स: यावरही एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट EMI चा लाभ घेता येईल.
वैशिष्ट्ये: यात ॲक्शन बटण (Action Button), अपग्रेडेड कॅमेरा आणि ऍपल इंटेलिजन्स (Apple Intelligence) सारखे नवीन फीचर्स आहेत. परफॉर्मन्ससाठी यात ए१८ बायोनिक (A18 Bionic) चिपसेट वापरला आहे.
आयफोन १७ लॉन्च होण्यापूर्वी हे दोन्ही फोन कमी बजेटमध्ये आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य मॉडेल निवडू शकता.
हेही वाचा : GST Reform जीएसटी बदलानंतर स्वस्त वस्तूंचीच चर्चा; पण हा फटका! कोणत्या गोष्टी महाग होणार? जाणून घ्या
-
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय! अदानी फाऊंडेशन भारतातील 10 लाख महिलांना देणार उद्योजकतेचे बळ -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार! -
'धुरंधर-2' साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; रणवीर सिंहच्या स्पाय-ॲक्शन थ्रिलरचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! -
Maharashtra weather update: एकीकडे महाराष्ट्र तापला! दुसरीकडे 'या' ठिकाणी पावसाचा इशारा -
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने मोडला पवन कल्याणचा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी बाॅलीवूडला हादरवणारी 'एवढी' कमाई -
शिवम दुबे-अंजुम खानची 'हटके' लव्हस्टोरी; धर्माची भिंत ओलांडली! शिवमपेक्षा पत्नी वयाने 'एवढी' मोठी








Click it and Unblock the Notifications