देशातील पहिले गोल्ड ATM सुरू! गोल्ड जुने सोने द्या आणि 30 मिनिटांत रोख पैसे मिळवा; अशी आहे प्रक्रीया
India first ai powered gold atm : अडल्या-नडल्या वेळी घरात ठेवलेले सोने विकून पैसे मिळवणे आता अधिक सोपे आणि जलद झाले आहे. अनेकदा जुने सोने विकण्यासाठी ज्वेलर्सकडे तासनतास ताटकळत राहावे लागते, तिथे सोन्याची शुद्धता आणि वजनावरून होणारी घासाघीस ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरते. मात्र, आता या सर्व कटकटींपासून सुटका होणार आहे.
फिनटेक कंपनी 'गोल्डसिक्का'ने हैदराबादमध्ये देशातील पहिले AI-पावर्ड गोल्ड एटीएम लाँच केले आहे, जे अवघ्या ३० मिनिटांत तुमच्या सोन्याचे पैसे थेट बँक खात्यात जमा करते!

कसे काम करते हे 'गोल्ड एटीएम'?
हे एटीएम पूर्णपणे आर्टिफीशिअल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानावर आधारित असून प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या सोन्याचे योग्य दर मिळू शकतील, जाणून घेऊया यासंदर्भात प्रक्रिया..
१. सोन्याची शुद्धता तपासणी
ग्राहकाने मशीनमध्ये सोने ठेवताच, मशीन ते वितळवण्याची प्रक्रिया सुरू करते आणि एआयच्या मदतीने सोन्याची अचूक शुद्धता आणि वजन तपासले जाते.
२. लाईव्ह मार्केट रेट
सोन्याचा दर्जा तपासल्यानंतर, त्याच क्षणी बाजारात असलेल्या सोन्याच्या दराप्रमाणे किंमत मोजली जाते.
३. थेट बँक खात्यात पैसे
ग्राहकाला किंमत मान्य असल्यास, ती रक्कम त्वरित त्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपाची गरज भासत नाही.
गोल्ड एटीएमची खास वैशिष्ट्ये
व्हर्च्युअल ज्वेलरी ट्राय-ऑन
यामध्ये ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे ग्राहक कोणती ज्वेलरी त्यांच्यावर कशी दिसेल हे 'व्हर्च्युअली' तपासून पाहू शकतात.
सोन्याची नाणी खरेदी
या मशीनमधून तुम्ही २४ तास ०.५ ग्रॅम ते १०० ग्रॅमपर्यंतची सोन्याची नाणी थेट खरेदी करू शकता.
कडक सुरक्षा व्यवस्था
फसवणूक रोखण्यासाठी ग्राहकांना व्यवहारापूर्वी KYC (नो युवर कस्टमर) पूर्ण करणे अनिवार्य आहे. तसेच, हे यंत्र गुन्हेगारी नोंदीही तपासते, संशयास्पद वाटल्यास व्यवहार त्वरित ब्लॉक केला जातो.












Click it and Unblock the Notifications