ICICI बँकेत खाते उघडताय? आता 50 हजार रुपये खात्यात शिल्लक ठेवावे लागणार! जाणून घ्या काय झाले बदल
ICICI Bank Minimum Balance : ICICI बँकेने नवीन खाते उघडणाऱ्यांना झटका दिला आहे. आता जर तुम्हाला आयसीआयसीआय बँकेत नवीन खाते उघडायचे असेल तर पाच दहा हजार नव्हे तब्बल 50 हजार रुपये मिनिमम बॅलेंस म्हणजेच शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम इतर बँकांच्या MIB -शिल्लक रक्कम ठेवण्याच्या अटीत जास्त रक्कम आहे.
आयसीआयसीआय ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कर्ज देणारी बँक आहे. या बँकेने त्यांच्या बचत खात्याच्या नियमांमध्ये मोठी सुधारणा केली आहे. ही सुधारणा प्रत्येक सामान्यांना परवडणारी आहे असे नाही. 1 ऑगस्ट 2025 रोजी किंवा त्यानंतर उघडलेल्या नवीन खात्यांसाठी मासिक किमान सरासरी शिल्लक (MAB) चा आकडा या बँकेने वाढवला आहे.

कसे आहे सुधारित नियम (शहर, निमशहर आणि ग्रामीण भाग)
- ICICI बँकेच्या बचत खात्याचे नवे नियम (१ ऑगस्ट २०२५ पासून)
- ICICI बँकेने १ ऑगस्ट २०२५ पासून उघडल्या गेलेल्या नवीन खात्यांसाठी मासिक किमान सरासरी शिल्लक (MAB) च्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
नवीन खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा (MAB): (आकडे हजारांत)
- महानगर आणि शहरी भाग: ₹50,000
- निमशहरी (अर्ध-शहरी) भाग: ₹25,000
- ग्रामीण भाग: ₹10,000
जुना खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा: (आकडे हजारांत)
- महानगर आणि शहरी भाग: ₹10,000
- निमशहरी (अर्ध-शहरी) भाग: ₹5,000
- ग्रामीण भाग: ₹5,000
दंड आणि इतर शुल्क कसे असेल?
जर खात्यात आवश्यक किमान शिल्लक (MAB) राखली नाही, तर बँक तुटीच्या 6 टक्के किंवा 500 यापैकी जी रक्कम कमी असेल, तो दंड म्हणून बँक आकारेल.
रोख ठेव नियम (Cash Deposit): दरमहा 3 मोफत रोख ठेवी करता येतात. त्यानंतर प्रत्येक ठेवीसाठी ₹150 शुल्क लागेल. दरमहा एकूण मोफत ठेव मर्यादा ₹1 लाख आहे.
रोख काढण्यावर किती शुल्क (Cash Withdrawal): दरमहा 3 मोफत रोख पैसे काढता येतात, त्यानंतर मानक शुल्क लागू होईल.
थर्ड पार्टी ठेव (Third-Party Deposit): प्रति व्यवहार ₹25,000 पर्यंत मर्यादित आहे.
आणखी काय काय केले महत्त्वाचे बदल
बचत खात्यावरील व्याजदर : एप्रिल 2025 मध्ये, ICICI बँकेने ₹50 लाखांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदर 0.25% ने कमी केला. आता यावर 2.75% व्याज मिळते.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांशी तुलना : ICICI बँकेचे हे नियम सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या SBI च्या विरुद्ध आहेत, कारण SBI ने 2020 मध्ये किमान शिल्लक ठेवण्याची अट काढून टाकली होती. इतर बँकांमध्ये ही मर्यादा सहसा 2 हजार ते 10 हजारांच्या दरम्यान असते.












Click it and Unblock the Notifications