काय सांगताय! तुमच्या हातातील मोबाईलद्वारे करू शकता जमीनीची मोजणी, ‘हे' अॅप ठरेल तुमचा साथीदार!
How to measure land through mobile : जमीन, म्हणजे फक्त एक भूखंड नाही, तर ती आपल्या मेहनतीची, आठवणींची आणि भविष्याची गुंतवणूक असते. मग ती शेतजमीन असो किंवा शहरातली मालमत्ता, तिची अचूक मोजणी होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण एकदा मोजणी चुकली की, वाद आणि कायदेशीर समस्यांचा एक लांबलचक प्रवास सुरू होतो. पण आता ही चिंता काही मिनिटांतच दूर होऊ शकते, ती देखील तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनच्या मदतीने.
मोबाईलने जमिनीची मोजणी कशी करायची?
आज आपण आपला मोबाईल फक्त सोशल मीडिया आणि मनोरंजनासाठी वापरतो, पण याच मोबाईलचा वापर करून तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी अगदी सहज करू शकता. यासाठी 'GPS Area Calculator' नावाचे एक अॅप Google Play Store वर उपलब्ध आहे. हे अॅप वापरून तुम्ही कुठल्याही खर्चाशिवाय आणि कमी वेळात जमिनीची अचूक मोजणी करू शकता.

अॅप वापरण्याची सोपी पद्धत:
- अॅप डाउनलोड करा: तुमच्या मोबाईलमधील Play Store वर जाऊन "GPS Area Calculator" किंवा "Google Map Area Calculator" असे सर्च करा आणि योग्य अॅप निवडू इंस्टॉल करा.
- GPS चालू करा: अॅप इन्स्टॉल झाल्यावर तुमच्या मोबाईलचे GPS (Global Positioning System) चालू करा. यामुळे अॅपला तुमचे अचूक स्थान कळेल.
- जागा शोधा: अॅप उघडून नकाशावर तुमचे राज्य, जिल्हा, तालुका निवडून तुमची जमीन शोधा.
- सीमा निश्चित करा: जमिनीच्या चारही कोपऱ्यांवर क्लिक करून तुम्हाला मोजायच्या असलेल्या भागाची सीमा निश्चित करा.
- मापन पद्धत निवडा: आता तुम्हाला हव्या असलेल्या मापन पद्धती (उदा. स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर) निवडा.
- मिळवा अचूक मोजणी: काही सेकंदातच तुमच्या जमिनीची अचूक मोजणी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
भारतात अशा अॅप्सची गरज का?
भारतात, विशेषतः ग्रामीण भागात, जमिनीच्या वादाचे प्रश्न खूप सामान्य आहेत. अनेकदा वडिलोपार्जित जमिनीची अचूक नोंद नसल्यामुळे किंवा शासकीय मोजणीसाठी महिने-महिने वाट पाहावी लागत असल्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद होतात. अशा वेळी, स्वतःच्या मोबाईलवरून जमिनीची मोजणी केल्याने त्वरित माहिती मिळते आणि अनेक संभाव्य वाद टाळता येतात.
जमिनीचे मोजमाप लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे
- १ एकर = ४० गुंठे
- १ गुंठा = १०८९ चौरस फूट
- १ एकर = ४३,५६० चौरस फूट
- १ हेक्टर = १,०७,६३६ चौरस फूट
ही मोजमापे लक्षात ठेवून, तुम्ही तुमच्या जमिनीची माहिती कधीही आणि कुठेही सहज तपासू शकता. त्यामुळे, आजच GPS Area Calculator अॅप डाउनलोड करा आणि आपल्या जमिनीची अचूक माहिती स्वतः ठेवा!












Click it and Unblock the Notifications