PF खात्यातून पैसे काढायचे आहेत का, मग चिंता सोडा, अगदी काही तासांत मिळवा पैसे, असा करा अर्ज!
How to withdraw PF money : आजच्या काळात बहुतेक नोकरदार लोकांकडे पीएफ (Provident Fund) खाते आहे. हे खाते केवळ बचतीचे साधन नसून, आर्थिक अडचणीच्या वेळी एक महत्त्वाचा आधार बनू शकते. कर्मचाऱ्यांच्या पगारातील 12 टक्के रक्कम आणि तेवढीच रक्कम कंपनीकडून या खात्यात जमा केली जाते.
तुम्हाला वाटत असेल की पीएफमधून पैसे काढणे ही एक अवघड व किचकट प्रक्रिया आहे, अर्थात सुरुवातीला ही प्रक्रिया अतिशय किचकट होतीच. मात्र, आता तसे राहिलेले नाही, योग्य प्रक्रिया वापरल्यास, तुम्ही काही तासांत किंवा जास्तीत जास्त 72 तासांमध्ये पैसे तुमच्या बँक खात्यात मिळवू शकता.

ऑनलाइन पीएफ क्लेम करण्याची सोपी प्रक्रिया
पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्ही खालील सोप्या प्रकियांचे पालन करून शकता...!
1. ऑनलाइन पोर्टलवर जा:
- सर्वप्रथम, https://unifiedportal-mem.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
2. क्लेम फॉर्म भरा:
- 'ऑनलाइन सेवा' (Online Services) या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर, 'क्लेम फॉर्म-३१, १९, १०सी आणि १०डी' (Claim Form-31, 19, 10C & 10D) हा पर्याय निवडा.
3. तपशील पडताळून पहा:
- तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक आणि आधार तपशील तपासण्यास सांगितले जाईल.
- तुमची KYC माहिती आणि बँक खाते UAN शी जोडलेले असणे आवश्यक आहे.
- ही माहिती बरोबर असल्यास प्रक्रिया अधिक जलद होते.
4. दावा सबमिट करा:
- फॉर्ममध्ये, तुम्हाला पैसे काढण्याचे कारण (क्लेम) निवडावे लागेल.
- आवश्यक माहिती भरल्यानंतर, OTP पडताळणी करा आणि तुमचा अर्ज (क्लेम) सबमिट करा.
72 तासांत पैसे येतील खात्यात!
जर तुम्ही फॉर्ममध्ये कोणतीही चूक केली नसेल आणि तुमची सर्व माहिती (UAN, आधार, बँक तपशील, KYC) अद्ययावत असेल, तर तुमचा अर्ज लवकर मंजूर होतो.
बहुतेक प्रकरणांमध्ये, ऑनलाइन अर्ज केल्यावर 72 तासांच्या आत पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. यामुळे, जेव्हा तुम्हाला पैशांची तातडीची गरज असेल, तेव्हा पीएफ खाते आता एक जलद आणि विश्वासार्ह पर्याय बनले आहे.












Click it and Unblock the Notifications