फायद्याची गोष्ट! GST बदलानंतर कमी पैशांत भरेल किराण्याची थैली; चहा, शॅम्पू, बिस्किटे होतील स्वस्त
Gst tax slab price cut Grocery items will available lower price : देशातील नागरिकांसाठी मोठी बातमी सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे. कारण थेट परिणाम ग्राहक आणि व्यापाऱ्यांवर होणार आहे. 3 आणि 4 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी परिषदेची 56 वी बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
जीएसटी कररचनेत मोठे बदल होतील असे खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्यदिनी म्हटले होते, त्यामुळे आता याकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. एवढेच काय तर आता जीएसटी परिषदेची बैठकही तोंडावर आली आहे, त्यामुळे यामध्ये काय काय निर्णय घेतले जातात याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

सध्याच्या चार कर स्लॅब (टॅक्स स्लॅब) ऐवजी फक्त 2 स्लॅब (5% आणि 12%) ठेवण्याचा प्रस्ताव आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर त्याचा थेट फायदा ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांनाही होऊ शकतो. ग्राहकांना थेट काय फायदा होईल हे जाणून घेऊया.
'हा' मिळू शकेल थेट फायदा
सप्टेंबरमध्ये जीएसटी 0.2 नुसार, 5 आणि 10 रुपयांच्या पॅकेटमधील बिस्किट, स्नॅक्स, चहा, शॅम्पू , नुडल्स आणि इतर आवश्यक गोष्टी सध्या ज्या प्रमाणात मिळत आहेत, त्यात वाढ होईल. किमत तीच असेल पण वस्तू जास्त वजनाची येऊन पॅकेट मोठे होऊ शकते.
खरेदीसाठी आपण गेलात तर त्यावर कमी कर आकारला जाईल म्हणजेच कमी पैशांत जास्त वस्तू घेता येईल म्हणजेच ग्राहकांची कमी पैशांत थैली भरेल.
मागील दोन वर्षांच्या तुलनेत वस्तूंच्या किमतीत हा मोठा बदल आहे, पामतेल, कोको, काॅफी आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे पॅकींग मालाच्या वस्तूचे वजन आणि आकार कमी झाला आहे.
खाद्य कंपन्यांचे 'हे' पाऊल
नेस्ले, आईटीसी, टाटा कंझ्युमर, ब्रिटानिया, हिंदूस्तान युनीलीव्हरसारख्या मोठ्या कंपन्या लवकरच नवीन स्टाॅक जारी करण्याच्या तयारीत आहे. कारण जीएसटी 0.2 च्या घोषणांनंतर पॅकेटमध्ये बदल करुन सामान्य ग्राहकांना फायदा मिळू शकेल.
5 , 10 रुपयांच्या पाकिटाचे वजन वाढेल
वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, बिस्किटांची पाकिटे खासकरुन 5 ते 10 रुपयांच्या किमतीत मिळतात. गाव-तालुका पातळीवर या पॅकेटचे मोठे ग्राहक आहेत. त्यामुळे ब्रिटानियासारख्या कंपनींचे 60 टक्क्यांपेक्षा जास्त विक्री याच प्रकारात होते, त्यामुळे आता जास्त पैसे देण्याऐवजी, लोकांना त्याच 5 किंवा 10 रुपयांच्या पॅकमध्ये जास्त प्रमाणात मिळेल.
हेही वाचा : l तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे! 1 सप्टेंबरपासून बदलणार 5 महत्वाचे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम












Click it and Unblock the Notifications