Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गोल्डमन सॅक्सची 'ही' भविष्यवाणी तुमची झोप उडवेल; सोने पोहोचणार दीड लाखांच्या घरात, का? तर वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणानंतर सोन्याच्या किंमती उतरतील, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. काहींनी तर सोने थेट ५० हजार रुपये प्रतितोळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र आता अगदीच उलटेच झाल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. आता गोल्डमन सॅक्सकडून सोन्याच्या किमतीबाबत एक अहवाल आला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, सोन्याची किंमत प्रति औंस $४५०० म्हणजेच प्रति १० ग्रॅम १,३६,००० पर्यंत पोहोचू शकते. या अहवालामुळे सामान्यांच्या सोने खरेदीच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे.

Goldman Sachs  prediction

काय आहे अहवालात?

गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार, अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे आणि मंदीच्या भीतीमुळे २०२५ च्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति औंस ४५०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. गोल्डमन सॅक्सने पुन्हा एकदा सोन्याच्या लक्ष्य किमतीत वाढ केली आहे. या वर्षी सोन्याचा लक्ष्यित भाव प्रति औंस $३७०० आहे. गोल्डमन सॅक्सने सोन्याच्या लक्ष्य किंमतीत वाढ करण्याची ही तिसरी वेळ आहे. मार्चच्या सुरुवातीला, सोन्याचा लक्ष्य भाव प्रति औंस $३३०० निश्चित करण्यात आला होता.

गोल्ड ईटीएफचा भाव काय?

गेल्या आठवड्यात गोल्ड ईटीएफने पहिल्यांदाच प्रति औंस $३२०० ची पातळी ओलांडली. जागतिक स्तरावर वाढत्या तणावामुळे गोल्ड ईटीएफचा दर प्रति औंस $३२४५.६९ च्या पातळीवर पोहोचला होता. भौतिक आणि विनिमय व्यापारात सोन्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळेच सोन्याचे भाव वाढल्याचे सांगण्यात आले. सोने खरेदी करण्याकडे अनेकांचा कल दिसून आला.

आज किती होते दर?

सोन्याच्या किमतीत सोमवारी १०० रुपयांची घट झाली. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोने ९५,६०० रुपयांच्या वर व्यवहार करत आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ८७,८४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,८१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. भारतातील सोन्याची किंमत अनेक कारणांमुळे बदलत राहते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+