Gold Price Today: मार्चच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीचा भाव किती आहे? घ्या जाणून
Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतीत दररोज चढउतार पाहायला मिळतो. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी (ता. 1 मार्च 2025) शनिवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत ही घसरण सुरू आहे. शनिवारी सोन्याच्या किमतीत सुमारे 500 रुपयांची घसरण झाली. त्याच वेळी चांदीच्या दरात सुमारे 1100 रुपयांची घसरण झाली आहे.
गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत 1400 रुपयांची घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 500 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 450 रुपयांची घसरण झाली आहे. यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,800 रुपयांवर पोहोचली आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,500 रुपयांवर पोहोचली आहे.

दरम्यान आज एक किलो चांदीची किंमत 96,900 रुपयांच्या घरात आहे. चांदीच्या किंमतीत सुमारे 1100 रुपयांची घसरण झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी भारतीय सराफा बाजारात एक किलो चांदीची किंमत 98 हजार रुपयांच्या घरात होती. तर 27 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव 95,725 रुपये प्रति किलो होता.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,662 आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,940 रुपये आहे.
ठाणे- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,662 आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,940 रुपये आहे.
पुणे- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,662 आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,940 रुपये आहे.
नागपूर- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,662 आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,940 रुपये आहे.
नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,665 आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,943 रुपये आहे.
जळगाव- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,662 आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,940 रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,662 आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,940 रुपये आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
तुम्ही स्वतः सोन्याचे नवीनतम दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.












Click it and Unblock the Notifications