Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Today Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने फटकारले अन् भारतात Gold Rate घसरले, जाणून घ्या रेट

Today Gold and Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गुरुवारी दि. 29 मे रोजीचा सराफा बाजारातील सोन्या चांदीच्या भावातील चढउतार देखील तितकाच महत्त्वाचा पाहायला मिळाला. सातत्याने वाढत असलेले सोने आज मात्र काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले, त्याचे कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

कारण, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सरकारला तेथील न्यायालयाने टॅरिफ करावरुन जो फटकार मारला, त्याचा परिणाम जगभरातील सराफा बाजारावर पडल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. एव्हाना सराफा बाजारातील आकड्यांवरुन देखील ते पाहायला मिळाले आहे.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचा व्यवहार 664 रुपयांच्या घसरणीसह 94,614 रुपयांच्या किमतीने सुरू झाला, तर भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव सुमारे 800 रुपयांनी घसरून 94830 रुपयांवर पोहोचला. हे आकडे अमेरिकेतील त्या घटनेनंतर पाहायला मिळाले. दुसरीकडे, आज भारतात चांदीची किंमत प्रति ग्रॅम ₹100 आणि प्रति किलोग्रॅम ₹1,00,000 आहे.

Today Gold Rate

ट्रम्प यांना फटकारल्यानंतर सोने कोसळले

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या सोन्या-चांदीच्या दरानुसार, 24 कॅरेट ते 18 कॅरेटपर्यंत सोन्याच्या किमतीत मोठे बदल दिसून आले आहेत. ते खालीलप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळतील.

  • 24 कॅरेट सोने 95,627 रुपयांवरून 94,830 रुपयांवर आले.
  • 22 कॅरेट सोन्याची किंमत 87,594 रुपयांवरून 86,864 रुपयांवर आली.
  • 18 कॅरेट सोन्याची किंमत 71,720 रुपयांवरून 71,123 रुपयांवर आली.
  • 1 किलो चांदीची किंमत 97,653 रुपयांवरून 97,664 रुपयांवर गेली.

सोन्याची किंमत का घसरली?

गुरुवारी सोन्याची किंमत एका आठवड्यापेक्षा जास्त काळातील सर्वात कमी पातळी गाठली. या घसरणीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेत घडलेली अतिशय महत्त्वाची घटना.

प्रत्यक्षात, अमेरिकन फेडरल कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले. ट्रम्प यांचा टॅरिफवरील निर्णय उलटवत न्यायालयाने तो चुकीचा असल्याचे म्हटले आणि स्पष्ट शब्दात म्हटले की हा निर्णय घेणे त्यांच्या अधिकारक्षेत्रात नाही.

ट्रम्प यांचा निर्णय उलटवत न्यायालयाने म्हटले की लिबरेशन डे टॅरिफ चुकीचा आहे आणि त्यावर बंदी घातली. अमेरिकन न्यायालयाच्या या निर्णयामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची चमक कमी झाली आहे.

यासोबतच मजबूत अमेरिकन डॉलरनेही सोन्यावर दबाव आणला. लोक सोन्याऐवजी गुंतवणुकीच्या इतर मार्गांकडे वळू लागले. सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्याची प्रतिमा कमी झाली आणि गुंतवणूकदार शेअर बाजाराचा मार्ग स्वीकारू लागले.

शहर 24 कैरेट 22 कैरेट 18 कैरेट

  • चेन्नई - ₹9,748 - ₹8,935 - ₹7,360
  • मुंबई - ₹9,748 - ₹8,935 - ₹7,311
  • दिल्ली - ₹9,763 - ₹8,950 - ₹7,323
  • कोलकाता - ₹9,748 - ₹8,935 - ₹7,311
  • बैंगलोर - ₹9,748 - ₹8,935 - ₹7,311
  • हैदराबाद - ₹9,748 - ₹8,935 - ₹7,311
  • केरल - ₹9,748 - ₹8,935 - ₹7,311
  • पुणे - ₹9,748 - ₹8,935 - ₹7,311
  • वडोदरा - ₹9,753 - ₹8,940 - ₹7,315
  • अहमदाबाद - ₹9,753 - ₹8,940 - ₹7,315
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+