Gold Silver Rate:सोने-चांदीच्या दरात 'हाय-व्होल्टेज' चढउतार; खरेदीपूर्वी जाणून घ्या आठवड्यातील किमती
Gold and silver rate record : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. 5 ते 9 जानेवारी 2026 दरम्यान पार पडलेल्या व्यवहारांमध्ये मौल्यवान धातूंनी कधी उच्चांक गाठला, तर कधी गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का देत दरात घसरण झाली. विशेषतः चांदीच्या दराने या आठवड्यात मोठी झेप घेतली आहे.

सोन्याचा दर: एका तोळ्यासाठी किती मोजावे लागतील?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील आकडेवारीनुसार, सोन्याच्या दरात या आठवड्यात माफक वाढ झाली आहे.
आठवड्याची सुरुवात : २ जानेवारी रोजी सोन्याचा दर प्रति तोळा (१० ग्रॅम) १,३५,७६१ रुपये होता.
आठवड्याचा शेवट : ९ जानेवारी रोजी सोने १,३८,८७५ रुपयांवर बंद झाले.
वाढ : संपूर्ण आठवड्याचा विचार करता सोन्याच्या दरात ३,११४ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.
संधी : सोन्याने या आठवड्यात १,४०,४६५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोनं प्रति तोळा १,५९० रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
चांदीचा दर: ऐतिहासिक तेजीनंतर किंचित घसरण
चांदीच्या दराने या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. चांदीमध्ये सोन्याच्या तुलनेत मोठी वाढ पाहायला मिळाली.
उच्चांकी भरारी: या आठवड्यात चांदीने प्रति किलो २,५९,६९२ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता.
बंद भाव: ९ जानेवारी रोजी चांदी ७२३ रुपयांच्या घसरणीसह २,५२,००२ रुपये प्रति किलोवर स्थिरावली.
आठवड्यातील नफा: २ जानेवारीच्या (२,३६,३१६ रुपये) तुलनेत चांदीच्या दरात एका आठवड्यात तब्बल १५,६८६ रुपयांची मोठी वाढ झाली आहे.
तुमच्या शहरातील सराफा बाजारातील दर (IBJA नुसार)
'इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन'ने (IBJA) जाहीर केलेले २४ कॅरेट ते १४ कॅरेट सोन्याचे प्रति तोळा दर खालीलप्रमाणे आहेत:
- सोन्याचा प्रकार दर : (प्रति १० ग्रॅम)
- २४ कॅरेट : (शुद्ध सोने) १,३७,१२० रुपये
- २२ कॅरेट :(दागिन्यांचे सोने) १,३३,८३० रुपये
- २० कॅरेट : १,२२,०४० रुपये
- १८ कॅरेट : १,१०,७०० रुपये
- १४ कॅरेट : ८८,४४० रुपये
खरेदीदारांसाठी महत्त्वाची माहिती
जर तुम्ही लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदीचा विचार करत असाल, तर एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. जरी सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात वाढ झाली असली, तरी उच्चांकी स्तरापेक्षा सोने १५०० रुपयांनी तर चांदी ७५०० रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळे बाजारातील रोजच्या चढ-उतारावर लक्ष ठेवून खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.












Click it and Unblock the Notifications