Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा चांगलीच वाढ झाली आहे. शनिवारी (14 सप्टेंबर) सोन्याच्या दरात झालेली वाढ आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किंमतीमुळे झाली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आहे.
देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 73 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 68 हजार रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 58 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदी 89 हजार किलो आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेटची किरकोळ किंमत काय आहे?

14 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत किती आहे ?
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 6,865 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 7,489 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,865 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,489 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,865 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,489 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,865 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,489 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,868 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,492 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,865 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,489 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 6,865 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,489 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
सोन्याच्या नवीन किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications