Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ; कालचा भाव केला पार! आजचा भाव काय? जाणून घ्या

Gold rate today oct 8 2025 : सणासुदीच्या धामधुमीत, खासकरून दिवाळी जवळ येत असताना, सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे! वाढती महागाई आणि जागतिक आर्थिक अस्थिरता यामुळे 'सोने' हा आजही सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. मात्र, बाजारातील मागणी-पुरवठ्याच्या खेळात सोन्या-चांदीचे दर रोज बदलत आहेत.

सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा बदल जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचा (८ ऑक्टोबरचा) नेमका दर काय आहे आणि कालच्या तुलनेत तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होऊ शकतो, हे पाहणे गुंतवणूकदारांसाठी अनिवार्य आहे.

Gold rate today oct 8 2025

आजचे सोन्या-चांदीचे प्रमुख दर (प्रति ग्राम)

आज, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी, भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्या आणि चांदीचे दर..

  • आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर १२ हजार ३३२ रुपये असून प्रति दहा ग्रॅमचा दर १ लाख २३ हजार ३२० रुपये आहे.
  • आज भारतात २२ कॅरेट सोने प्रतिग्रॅम ११ हजार ३०५ रुपये दराने विकले जात आहे तर प्रति १० ग्रॅमचा दर १ लाख १३ हजार ५० रुपये आहे.
  • आज भारतात १८ कॅरेट सोने ९ हजार २५३ रुपये प्रति ग्रॅम दराने विकले जात आहे तर प्रति १० ग्रॅमचा दर ९२ हजार ५३० रुपये इतका आहे.
  • आज भारतात चांदी प्रति ग्रॅम १५७ रुपये तर प्रति १० ग्रॅम १ हजार ५७० रुपये आणि प्रति किलोग्राम १ लाख ५७ हजार रुपये इतके दर आहेत.

    Take a Poll

    देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (प्रति १ ग्रॅम)

    देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात काही प्रमाणात फरक दिसून येत आहे. खालीलप्रमाणे १ ग्रॅम सोन्याचे (२४K, २२K, १८K) आजचे दर आहेत.

    • दिल्लीत आज सोन्याचे २४ कॅरेटचे प्रति १ ग्रॅम सोन्याचे दर १२ हजार ३३२ रुपये तर २२ कॅरेटचे ११,३०५ आणि १८ कॅरेटचे ९,२५३ रुपये दर आहेत.
    • मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचे १२,३१७ रुपये, २२ कॅरेट सोने प्रति १ ग्रॅम ११,२९० आणि १८ कॅरेट सोने प्रति ग्रॅम ९,२३८ रुपये दराने विकले जात आहे.
    • पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम भाव १२,३१७ रुपये २२ कॅरेटचा ११,२९० रुपये तर १८ कॅरेटचा ९,२३८ रुपये भाव आहे.
    • नागपूरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १२,३१७ रुपये, २२ कॅरेटचा ११,२९० रुपये तर १८ कॅरेट सोन्याचा ९,२३८ रुपये प्रति ग्रॅम दर आहे.
    • नाशिकमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा प्रती १ ग्रॅम दर १२,३२० रुपये, २२ कॅरेटचा दर ११,२९३ रुपये तर १८ कॅरेटचा दर ९,२४१ रुपये दर आहे.

    (सूचना: येथे दिलेले दर केवळ माहितीसाठी आहेत. सोन्याचे दर स्थानिक टॅक्स, मेकिंग चार्जेस आणि एक्साईज ड्युटीनुसार बदलू शकतात. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारात दर तपासावेत.)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+