Gold prices: 9 महिन्यात 24 हजार 541 रुपयांनी वाढले सोन्याचे भाव? सोन्या चांदीचे भाव किती वाढणार वाचा
Gold prices increased by Rs 24,541 in 9 months : सोन्याचे दर गेल्या पाच वर्षात दोनशे टक्क्यांनी वाढले म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी ही आनंदाची बातमी असली तरीही सोन्याच्या दराने सामान्यांचे मात्र, कंबरडे मोडले आहेत. सामान्यांच्या आवाक्याबाहेर सोन्याचे भाव गेले आहेत. या वर्षातील जानेवारी ते ८ ऑगस्टपर्यंत सोन्याचे भाव जवळपास २४ हजर ५४१ रुपयांनी वाढले आहेत.
सोने हे सदा-सर्वदा गुंतवणुकीचे उत्तम साधन मानले जाते. यंदा सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. सोन्याने यंदा सर्व रेकाॅर्ड मोडले आहेत. सोन्याचे सर्वोच्च भाव यंदा झाले असून लाखांच्या पार हे दर पोहचले आहेत.

भास्करच्या रिपोर्टनुसार, सोन्याचे भाव सध्या लाखांच्या घरात खेळत आहेत पण या वर्षात सोन्याचा दर एक लाख चार हजार रुपये प्रतितोळा होण्याची शक्यता आहे. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडीयांच्या माहितीनुसार भास्करने हे वृ्त्त दिले आहे.
का वाढणार सोन्याचे भाव?
केडिया यांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरीफ, सध्या जगात सुरु असलेला भु-राजकीय संघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेला तणाव यामुळे सोन्याचे दर वाढत आहे. सोन्याचे दर १ लाख ४ हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात.
चांदीचे भाव या वर्षात किती होणार?
सोन्यासारखीच चांदीही चकाकत असून यंदा चांदीचे रेकाॅर्डतोड भाव या वर्षात असतील. केडिया यांच्या मतानुसार ,चांदी १ लाख ३० हजारांपर्यंत जाऊ शकते असे
भास्करने म्हटले आहे.
सोन्याच्या भाववाढीचा या वर्षातील प्रवास कसा आहे?
- या वर्षी आतापर्यंत सोने २४,५४१ रुपयांनी महाग झाले आहे.
- डिसेंबर २०२४ मध्ये सोन्याचे दर ७६,१६२ रुपये प्रतितोळा होते.
या वर्षी म्हणजेच १ जानेवारीपासून आतापर्यंत, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७६,१६२ रुपयांवरून १ लाख ७०३ रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच २४,५४१ रुपयांची वाढ या नऊ महिन्यात झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये चांदीची किंमत ८६,०१७ रुपये प्रति किलो होते. हे भाव कालपर्यंत २९ हजार २३३ रुपयांनी वाढून ते आता १ लाख १५ हजार २५० रुपयांवर पोहोचले आहेत.












Click it and Unblock the Notifications