Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एका आठवड्यात एवढ्या रुपयांनी वाढले सोने! चांदी 3 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

Gold prices increased by Rs 1,420 in a week : देशात सोन्याचे दर सातत्याने वाढत असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोन्याच्या दरात कमालीची वाढ झाली. या वर्षात सोन्याचे भाव डोळे विस्फारतील एवढे झाले आहेत. विशेष म्हणजे यंदा सोन्याचे भाव प्रतितोळा जवळपास लाखांच्या घरात आहेत. तर चांदीचे भाव जवळपास 3 हजारांनी मागील सात दिवसांत कमी झाले आहेत.

Gold prices increased

सात दिवसांत किती वाढले सोन्याचे दर

गेल्या एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत १ हजार ४२० रुपयांनी वाढले आहेत. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर आता प्रति १० ग्रॅम ₹१,०१,५०० वर पोहोचला आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याचा दर १३०० रुपयांनी वाढून ९३ हजार ५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १ हजार ३५० रुपये आणि २२ कॅरेटचा दर ९२ हजार ९०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

आज भारतात चांदीची किंमत किती आहे?

या आठवड्यात चांदीच्या किमती ३ हजार रुपयांनी घसरल्या आहेत. ३ ऑगस्ट रोजी चांदीची किंमत १ लाख १३ हजार रुपये प्रति किलो नोंदवली गेली. तर २ ऑगस्ट रोजी इंदूर सराफा बाजारात चांदी १ हजार रुपयांनी महाग झाली आणि १ लाख १२ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.

६ वर्षांत सोने तीन पट महागले आहे, किमतीत २०० टक्क्यांची प्रचंड वाढ

वनइंडिया हिंदीनुसार, गेल्या ६ वर्षांत सोन्याचे दर तिप्पट झाले आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (MOFSL) च्या अलीकडील अहवालानुसार, मे २०१९ मध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ३० हजारांवर होती. त्याच वेळी, जून २०२५ पर्यंत, त्याची किंमत प्रति १० ग्रॅम १ लाखांच्या पुढे गेली आहे. म्हणजेच ६ वर्षांत सुमारे २०० टक्क्यांची डोळे विस्फारतील एवढी वाढ झाली आहे.

अहवालात असेही म्हटले आहे की २०२५ मध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आतापर्यंत सोने ३० टक्क्यांपेक्षा जास्त महाग झाले आहे. देशांतर्गत आणि जागतिक अनिश्चितता, डॉलरमधील चढउतार आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या ट्रेंडमुळे ही वाढ दिसून आली आहे. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणुकीच्या बाबतीत सोने अजूनही एक विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय मानला जातो.

सहा वर्षांत सोन्याने दिला २०० टक्के परतावा

तज्ज्ञ सांगतात, "गेल्या सहा वर्षांत सोन्याने जवळजवळ २०० टक्के चा उत्कृष्ट परतावा दिला आहे, जून २०१९ मध्ये सुमारे ३४ हजार २०० रुपयांवरुन २०२५ मध्ये सुमारे ९७ हजार ८०० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ जागतिक स्तरावरील आर्थिक कारणामुळे झाली. यामध्ये कोविड-१९ महामारी, अति-सवलत आर्थिक धोरणे, भू-राजकीय तणाव आणि वित्तीय बाजारपेठेतील वाढती अनिश्चितता यांचा समावेश आहे.

का वाढत आहेत सोन्याचे दर?

सोने भारतात प्रत्येक कुटुंबात भावनिक आणि खरेदीचा मुद्दा असतो. गेल्या दोन वर्षांत, विशेषतः रशिया-युक्रेन संघर्षानंतर रशियाच्या परकीय चलन साठ्याचा मोठा भाग घटला. त्यातच जागतिक संघर्ष, अमेरिकचा धोरणाचा मुद्दा असलेला टॅरिफ वाद यातच मध्यवर्ती बँका सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची करत असलेली झपाट्याने खरेदी, चीनचे सोने साठवणूक धोरण यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत असा आतापर्यंतचा अंदाज आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+