दिवाळीनंतर चमक फिकी! सोने 'एवढ्या' रुपयांनी स्वस्त! का स्वस्त होत आहे सोन्याचे दर? वाचा कारणे
Gold Price Today Nov 3 2025 : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याभरात सोन्याचे दर तब्बल ₹२,६०० रुपयांनी खाली आले आहेत, तर चांदीच्या किमतीत थेट ₹३,००० रुपयांची मोठी घट नोंदवली गेली आहे. डॉलरची मजबुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी कमी झाल्यामुळे सोन्याला मोठा फटका बसला आहे.
विशेषतः, दसरा आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात झालेली खरेदी आता थंडावली असल्याने देशांतर्गत मागणीही मंदावली आहे. गुंतवणूकदारांसाठी ही घसरण एक उत्तम संधी मानली जात आहे.

आजचे सोन्याचे दर: ३ नोव्हेंबर २०२५ (Gold Rate Today)
सोन्याच्या प्रकारानुसार दर (Per 10 Gram)
- २४ कॅरेट शुद्ध सोने दर (प्रति १० ग्रॅम): ₹१,२३,१४० गेल्या आठवड्याभरातील बदल: ₹२,६२० स्वस्त
- २२ कॅरेट सोने दर (प्रति १० ग्रॅम): ₹१,१२,८९० गेल्या आठवड्याभरातील बदल: ₹२,४०० स्वस्त
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (३ नोव्हेंबर)
मुंबई
- २२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,१२,७४०
- २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,२२,९९०
पुणे
- २२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,१२,७४०
- २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,२२,९९०
नागपूर
- २२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,१२,८९०
- २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,२३,१४०
जळगाव
- २२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,१२,७९०
- २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,२३,०४०
दिल्ली
- २२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,१२,८९०
- २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,२३,१४०
चांदीचा दर : आज चांदीच्या दरात मोठी घसरण होऊन, ती गेल्या आठवड्याभरात ₹३,००० ने स्वस्त झाली आहे.
सोने दरात घसरण होण्याची कारणे काय?
तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या किमती घसरण्याची काही प्रमुख कारणे आहेत.
डॉलरची मजबुती: आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्याने सोन्यात गुंतवणूक कमी झाली.
बॉन्ड यील्डमध्ये वाढ: अमेरिकेतील बाँड यील्डमध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी बाँड्सकडे वळले.
मागणीत घट: सणासुदीची खरेदी पूर्ण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी मंदावली आहे.
विश्लेषकांचे मत: अल्पावधीत सोन्याच्या किमती आणखी खाली येऊ शकतात. मात्र, दीर्घकाळात सोने आजही सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून कायम राहील.












Click it and Unblock the Notifications