Gold price Today : सोन्याचा भडका! 24 कॅरेट सोन्याचा भाव झाले 'एवढे!'; दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक
Gold price Today : सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या आणि गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस (२२ डिसेंबर २०२५) अत्यंत धक्कादायक ठरला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले असून, वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३४,००० रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबुती आणि डॉलरचा वाढता प्रभाव यामुळे सोन्याची झळाळी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे.

१. दिल्ली
- २४ कॅरेट: ₹ १,३४,३२०
- २२ कॅरेट: ₹ १,२३,१४०
- १८ कॅरेट: ₹ १,००,६४०
२. मुंबई
- २४ कॅरेट: ₹ १,३४,१७०
- २२ कॅरेट: ₹ १,२२,९९०
- १८ कॅरेट: ₹ १,००,६४०
३. कोलकाता
- २४ कॅरेट: ₹ १,३४,१७०
- २२ कॅरेट: ₹ १,२२,९९०
४. चेन्नई
- २४ कॅरेट: ₹ १,३४,१७०
- २२ कॅरेट: ₹ १,२२,९९०
सोन्याचा 'सुवर्ण' प्रवास: एका वर्षात दरांचा नवा उच्चांक
भारतीय सराफा बाजारात सोन्याने गेल्या वर्षभरात सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. "सोनं कधी स्वस्त होईल?" या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या ग्राहकांसाठी २०२५ हे वर्ष मोठ्या धक्क्यांचे आणि गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरले आहे. 'इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल २५% ते ३०% पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली असून, आजचे दर पुन्हा एकदा तेजीचे संकेत देत आहेत. जागतिक अस्थिरता आणि देशांतर्गत मागणी यामुळे सोन्याची झळाळी अधिकच वाढली आहे.
सोन्याचे दर एका वर्षात का गगनाला भिडले, ४ मु्द्दे महत्वाचे
१. भू-राजकीय तणाव
रशिया-युक्रेन आणि मध्य पूर्वेतील युद्धाच्या स्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा काळात गुंतवणूकदार शेअर बाजारापेक्षा सोन्याला 'सेफ हेवन' (सुरक्षित गुंतवणूक) मानतात, ज्यामुळे मागणी आणि भाव दोन्ही वाढले.
२. रुपयाची घसरण
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य सातत्याने घसरत आहे. भारत सोन्याचा मोठा आयातदार असल्याने, डॉलर महाग झाला की सोन्याची आयात महाग पडते आणि त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारातील दरवाढीवर होतो.
३. मध्यवर्ती बँकांची खरेदी
केवळ सर्वसामान्य जनताच नव्हे, तर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि जगातील इतर मध्यवर्ती बँकांनी आपल्या परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण वाढवले आहे. या मोठ्या खरेदीमुळे सोन्याच्या जागतिक किमतींना आधार मिळाला आहे.
४. व्याजदरात कपात आणि महागाई
अमेरिकेतील 'फेडरल रिझर्व्ह'ने व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्याने सोन्यातील गुंतवणूक अधिक आकर्षक ठरली आहे. तसेच, वाढत्या महागाईपासून संरक्षणाचे साधन म्हणूनही सोन्याकडे पाहिले जात आहे.












Click it and Unblock the Notifications