Gold Silver price today : खुशखबर! रक्षाबंधनाआधी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे भाव
Gold Silver price today : रक्षाबंधनाच्या सण अवघ्या चार दिवसांवर आला असून, अशातच तुम्ही सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. देशात आज सोन्याच्या दरात उतार पहायला मिळाला, तसेच आज चांदी देखील स्वस्त झाली आहे. चला तर मग पटापट जाणून घेऊया आजचे भाव.
देशात आजचा सोन्याचा भाव (Gold Rate Today In India)
देशात आज 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 1000 रुपयांनी कमी होऊन 65,700 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याची 10 ग्रॅमची किंमत 110 रुपयांनी कमी होऊन 71, 660 रुपये इतकी झाली आहे. याशिवाय 24 कॅरेट सोन्याची 100 ग्रॅमची किंमत 1,100 रुपयांनी कमी होऊन ती आता 7,16,600 रुपए इतकी झाली आहे.

18 कॅरेट सोन्याचे दर काय?
18 कॅरेट सोन्याच्या किमतीत आज 80 रुपयांचा उतार पहायला मिळाला. याची किंमत 53,760 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे तर 18 कॅरेट सोन्याची 100 ग्रॅमची किंमत आज 800 रुपयांनी कमी होऊन 5, 37,600 रुपये झाली आहे.
आज चांदीच्या दरात देखील उतार पहायला मिळाला. एक किलोग्रॅम चांदीची किंमत 500 रुपयांनी कमी होऊन 83,000 रुपये झाली. तसेच 100 ग्रॅम चांदीची किंमत आज 50 रुपयांनी कमी होऊन 8,300 रुपये इतकी झाली.
10 दिवसांत 22k/ 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत चढ-उतार
भारतातील सोन्याच्या किमतीत काल 13 आगस्टला 950 रुपयांची उसळी पहायला मिळाली. 12 ऑगस्टला 250 रुपयांची उसळी, तर 11 आॅगस्टला दर स्थिर राहिले. 10 आॅगस्टला 200 रुपयांची तेजी, तर 9 आॅगस्टला 750 रुपयांची उसळी, तसेच 8 ऑगस्टला किमती स्थिर राहिल्या. 7 आॅगस्टला 400 रुपयांचा उतार, तर 6 ऑगस्टला 800 रुपयांचा उतार पहायला मिळाला. 5 आणि 4 ऑगस्टला किमत स्थिर राहिली तर 3 आॅगस्टला 100 रुपयांनी दर कमी झाले.
10 दिवसांत 22k/ 10 ग्रॅम चांदीच्या किमतीत चढ-उतार
भारतात चांदीच्या किमतीत काल 13 आॅगस्ट रोजी 1000 रुपयांची तेजी तर 100 रुपये उतार, 11 तारखेला दर स्थिर तर 10 ऑगस्टला 100 रुपयांची वाढ, 9 ऑगस्टला 1500 रुपयांची तेजी, 8 ऑगस्टला 500 रुपयांचा तर 7 आॅगस्टला 500 रुपयांचा उतार, 6 ऑगस्टला 3200 रुपयांचा उतार, 5 ऑगस्टला 200 रुपयांची तेजी तर 4 ऑगस्टला भाव स्थिर राहिला तर 3 आॅगस्टला 1700 रुपयांनी भाव उतरला.
14 ऑगस्ट 2024 रोजी भारतातील 5 प्रमुख शहरांतील 1 ग्रॅम 22k सोन्याचा भाव
मुंबईत सोन्याचा भाव
मुंबईत 14 ऑगस्ट रोजी 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमचा भाव 6,555 रुपये आहे.
चेन्नईमध्ये सोन्याचा भाव
आज चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमचा भाव 6,555 रुपये आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव
दिल्लीत 14 ऑगस्ट रोजी 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,570 रुपये आहे.
कोलकातामध्ये सोन्याचा भाव
कोलकाता येथे 14 ऑगस्ट 2024 रोजी 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 6,555 रुपये आहे.
बंगळुरूत सोन्याचा भाव
बंगळुरूमध्ये 14 ऑगस्ट रोजी22 कॅरेट सोन्याची 1 ग्रॅमची किंमत 6,555 रुपये आहे.
केरळमध्ये सोन्याचा भाव
केरळमध्ये 14 ऑगस्ट रोजी 22 कॅरेट सोन्याची 1 ग्रॅमची किंमत 6,555 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications