अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सोन्याच्या भावाने नवीन उच्चांक गाठला, जाणून घ्या आजचे भाव
Gold Price Today : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प उद्या म्हणजेच शनिवार 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण या संसदेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी 31 जानेवारी रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव उच्चांकावर पोहोचल्याने सरकार अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क वाढवू शकते अशी अपेक्षा आहे. जर आयात शुल्क वाढवले तर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान सरकारने गेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी केले होते.

आज शुक्रवार 31 जानेवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत 300 रुपयांची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात सोने- चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. जानेवारी महिन्यातील एक-दोन दिवस वगळता सोन्याच्या भावात सातत्याने वाढ झाली आहे. आज भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 83 हजार रुपये आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार रुपयांच्या पुढे गेली आहे.
आज चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. बजेटच्या एक दिवस आधी चांदी प्रति किलो 2000 रुपयांनी महाग झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 98,600 रुपये आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया?
देशातील प्रमुख शहरांमधील आजचे सोन्यांचे भाव
मुंबई : मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 83,030 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 76,110 रुपये आहे.
दिल्ली : आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 83,180 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 76,260 रुपये आहे.
कोलकाता : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 76,110 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 83,030 रुपये आहे.
चेन्नई: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 76,110 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 83,030 रुपये आहे.
बंगळुरू: बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 76,110 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 83,030 रुपये आहे.
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 76,610 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 82,430 रुपये आहे.
लखनऊ : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 76,110 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 83,180 रुपये आहे.
हैदराबाद: हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 75,560 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 82,430 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications