Gold Price Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव किती? 22,24 कॅरेट सोन्याचा दर जाणून घ्या
Gold Price Today : नवीन वर्ष 2025 सुरू होताच सोन्याचे भाव वाढ होत आहे. नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 3 जानेवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात 330 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोने 300 रुपयांनी तर 24 कॅरेट सोने 330 रुपयांनी महागलं आहे. 1 आणि 2 जानेवारीला सोन्याच्या किंमतीतही वाढ झाली होती.
आज देशभरात 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. गेल्या वर्षी सोन्याने 2024 मध्ये गुंतवणूक केलेल्यांना 27 टक्के परतावा दिला आहे. 2010 पासून सोन्याची कामगिरी सर्वोत्तम आहे. सध्या लग्नाचा सीझन आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.

आज 3 जानेवारी रोजी चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. आज एक किलो चांदीचा दर 90,500 रुपये आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,275 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,920 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,260 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,920 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,260 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,920 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,260 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,920 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,263 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,923 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,260 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,920 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,260 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,920 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications