Gold Price Today : आज सोनं महाग की स्वस्त, जाणून घ्या काय आहे 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा सोन्याचा दर?
Gold Price Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार 13 डिसेंबर रोजी सोन्याचे भाव स्थिर राहिले आहेत. सोने आता 80 हजारांच्या घरात पोहोचले आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 900 रुपयांनी वाढला होता.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 73 हजार रुपयांच्या पुढे आहे. बाजारातील तज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होऊ शकते.

चांदीचे भाव आज शुक्रवारीही स्थिर राहिले आहेत. 13 डिसेंबर रोजी एक किलो चांदीचा दर 95,500 रुपये आहे. जाणून घेऊया देशातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव
मुंबई : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,470 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकत्ता: कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,520 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनऊ : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जयपूर : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पाटणा : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,520 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हैद्राबाद : हैद्राबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरू: बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications