सोन्याचा तोरा कायम! 2026 मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव दीड लाखांवर जाणार? वाचा काय म्हणतात दिग्गज तज्ज्ञ
Gold Price Prediction 2026 : गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्याने २०२५ मध्ये शेअर बाजारालाही मागे टाकत ऐतिहासिक परतावा दिला आहे. २०२५ च्या सुरुवातीला ७६,५०० रुपयांवर असलेले सोने वर्षाअखेरीस १.३५ लाखांच्या विक्रमी स्तरावर पोहोचले. मात्र, आता चर्चा सुरू आहे ती २०२६ ची! जागतिक घडामोडी आणि आर्थिक तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये सोन्याचे दर १.५० लाख ते १.७५ लाख रुपयांपर्यंत मजल मारण्याची दाट शक्यता आहे. मध्यमवर्गीय आणि गुंतवणूकदारांसाठी हा नवीन वर्षाचा सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.

२०२६ मध्ये सोने का महागणार?
१. कोटक सिक्युरिटीजचा मोठा दावा
वनइंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय बाजाराचा विचार करता, कोटक सिक्युरिटीजने अंदाज वर्तवला आहे की २०२६ मध्ये सोन्याचे दर १.५० लाख रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतात.
२. जागतिक संस्थांचे अंदाज
'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल'च्या मते सोन्यात ३० टक्क्यांची, तर 'गोल्डमॅन सॅक्स'नुसार २० टक्क्यांची दरवाढ अपेक्षित आहे.
३. भू-राजकीय तणाव
जगभरातील युद्धजन्य परिस्थिती आणि अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत.
४. डॉलरची घसरण
अमेरिकन डॉलरची कमजोरी सोन्याच्या दरासाठी पोषक ठरत आहे. डॉलर स्वस्त झाला की सोन्याची मागणी आणि किंमत वाढते.
५. व्याजदरात कपात
आरबीआय (RBI) आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने एफडी (FD) ऐवजी लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
टेक्निकल आउटलुक: MCX वरील स्थिती
तांत्रिक चार्टनुसार, सोन्यासाठी १,३४,५०० रुपये हा स्तर सध्या मजबूत आधार (Support) आहे. जोपर्यंत भाव या स्तराच्या वर आहेत, तोपर्यंत तेजी कायम राहील. वरच्या दिशेला १,४५,००० रुपये हे पहिले मोठे लक्ष्य असेल. चांदीबद्दल बोलायचे झाले तर, चांदी २,४०,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
घसरणीचा धोका आहे का?
काही तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशाराही दिला आहे. जर जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी कमी केली, तर किमतीत मोठी घसरण होऊ शकते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता अशी शक्यता कमीच वाटते.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला
जर तुमची गुंतवणूक दीर्घकालीन असेल, तर तज्ज्ञांच्या मते सोने हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र, इतक्या मोठ्या वाढीनंतर मध्येच काही प्रमाणात नफावसुली किंवा किमतीत थोडी घसरण येऊ शकते, हे लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा.












Click it and Unblock the Notifications