Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold price : सोन्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर! 1 लाखांपार गेला दर, आजचे दर काय जाणून घ्या

Gold price crosses Rs 1 lakh beyond reach of common man : सोन्याची झळाळले असून त्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोन्याचे भाव वाढण्यामागे इराण-इस्त्रायल संघर्ष आणि कमकुवत झालेला रुपया कारणीभूत ठरला आहे. आता सोन्याचे भाव तुमच्या आमच्या अर्थात सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत असेच म्हणावे लागेल. कारण सोन्याचे भाव तब्बल एक लाख रुपये पार गेले आहेत.

Gold price

आज १६ जून २०२५ सोन्याचे भाव काय?

आज १६ जून २०२५ सकाळी सोन्याच्या भावात वाढ दिसून आली. गत काही काळापासून सोन्याच्या दात चढ-उतार सुरूच आहेत. आज भारतात २४ कॅरेट सोने प्रति ग्रॅम ₹ १०,१८२ दराने विकले जात आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹ ९,३३४ वर दर पोहोचले आहेत. १८ कॅरेट सोने आज ₹ ७,६३७ दरात विकले जात आहे.

भाव बदलत आहेत, तपासूनच खरेदी करा

इस्रायल-इराण तणावादरम्यान, सोन्याने एक लाखाचा टप्पा ओलांडला. सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरतेमुळे कमी जास्त होत आहेत पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे भारतात सध्या लग्नसराई सुरु आहे, अशा हंगामात आणि गुंतवणूकीची योजना आखणाऱ्यांसाठी, सोन्याच्या किमतींवर लक्ष ठेवण्याची ही महत्वाची वेळ आहे. कारण प्रत्येक लहान किंवा मोठी हालचाल तुमच्या खिशाला फटका देऊ शकते.

  • भारतात आज २२ कॅरेट सोन्याचे किती भाव आहेत
  • १ ग्रॅम: ९,३३४ रुपये
  • ८ ग्रॅम: ७४,६७२ रुपये
  • १० ग्रॅम: ९३,३४० रुपये
  • १०० ग्रॅम: ९,३३,४०० रुपये

भारतात आज २४ कॅरेट सोन्याचे किती भाव आहेत

  • १ ग्रॅम: १०,१८२ रुपये
  • ८ ग्रॅम: ८१,४५६ रुपये
  • १० ग्रॅम: १,०१,८२० रुपये
  • १०० ग्रॅम: १०,१८,२०० रुपये

भारतात आज १८ कॅरेट सोन्याचे किती भाव आहेत

  • १ ग्रॅम: ७,६३७ रुपये
  • ८ ग्रॅम: रु ६१,०९६
  • १० ग्रॅम: ७६,३७० रुपये
  • १०० ग्रॅम: ७,६३,७०० रुपये

सोन्याचे भाव वाढीचे कारण

सोन्याचे भाव वाढीचे कारण महत्वाचे ठरत आहे, ते म्हणजे अमेरिकन डॉलरमधील कमकुवतपणा हा होय. यामुळे सोने महाग होत आहे. देशात एका आठवड्यात २४ कॅरेट सोने ३,७१० रुपयांनी महागले आहे, यामुळे २४ कॅरेट सोने एक लाख रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. एका आठवड्यात २२ कॅरेट सोन्याची किंमत ३४०० रुपयांनी वाढली आहे.

हेही वाचा : Gold price : एकाच आठवड्यात 3 हजार 710 रुपयांनी वाढले सोने! काय आहे मुळ कारण; जाणून घ्या आजचे भाव

हेही वाचा : Gold Loan :सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांना मिळेल आता जास्त रक्कम! पण कशी? उदाहरणासह समजून घ्या 5 मुद्द्यात

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+