'या' शहरात सापडल्या सोन्याच्या खाणी! खोदकाम सुरु हे राज्य होईल मालामाल, सोन्याचे भाव कमी होतील का?
Gold mines discovered in Singrauli district of MP : सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत,अशातच सोने एक लाखाजवळ पोहचले आहे. एक तोळा सोने घ्यायच झाले तरीही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे लग्नासाठी आणि इतर गोष्टींसाठी सोने घेताना अनेकजण चिंतेत आहे, सोने कमी होणार की भाव वाढणार याचीही चिंता आहेच पण या चिंतेत एक गुड न्यूज समोर आली आहे.
ओडीसानंतर मध्यप्रदेशातही आता सोन्याच्या खानी सापडल्या आहेत. मध्य प्रदेशातील सिंगरौली हा जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे. या ठिकाणी सोन्याच्या खानी सापडल्या आहेत. यामुळे आता भारतात सोन्याच्या खानींची संख्या वाढताना दिसत आहे.

मध्यप्रदेशात कुठे सापडल्या सोन्याच्या खाणी
मध्यप्रदेशात सिंगरौली हा जिल्हा आहे. हा जिल्हा कोळशाच्या खानीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कोळशासाठी खोदकाम सुरु असते. अशातच या जिल्ह्यात नुकतीच सोन्याची खाण सापडली आहे. सिंगरौली जिल्ह्यातील या सोन्याच्या खाणींचा लिलाव पूर्ण झाल्यानंतर खोदाईचे काम सुरू झाले आहे.
सोन्याच्या खाणीत खोदकाम सुरु
रिसतर कायदेशीर प्रक्रीया पार पडल्यानंतर आता सोन्याच्या खाणीचे टेंडरही पुर्ण झाले. त्यानंतर आता खाणींमध्ये यंत्रे कामाला लागली आहेत. सोन्याच्या चारही खाणी वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. या कंपन्यांनी खाणींमध्ये मशिनच्या सहाय्याने काम सुरू केले आहे. प्राप्त माहितीनुसार, याद्वारे मध्यप्रदेश राज्याला अडीचशे कोटींचा महसूल मिळणार असून राज्याच्या विकासात यामुळे भर पडणार आहे.
सिंगरौलीआधी कुठे सापडली सोन्याची खाण
मध्यप्रदेशातील सिंगरौली येथे सोन्याच्या खाणी सापडल्या, त्यापैकी चार खाणीत खोदकाम सुरु आहे तर याआधी ओडीसा राज्यातील सुनगढ, नबरंगपूर, अंगुल आणि कोरापुट जिल्ह्यात सोन्याचा साठा असल्याचे निष्पन्न झाले आहे. ओडिशा सरकार या सोन्याच्या साठ्यांबाबत चोख आणि दक्षतापूर्वक शोधकाम सुरु केले आहे.
या जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणीचा शोध सुरू?
ओडीसातील देवगड जिल्ह्यातील अदासा-रामपल्ली परिसरातही सोन्याचे साठे सापडले होते. त्यामुळे केओंजर जिल्ह्यातील गोपूर-गाझीपूर, मंकडचुआन, सालीकाना आणि दिमिरमुंडा भागातही सोन्याच्या खाणीचा शोध सुरू आहे.
सोन्याचे भाव कमी होणार का?
देशात सोन्याला मोठी मागणी आहे, त्यामुळे भारत देशही सोन्याचा मोठा आयातदार देश आहे. ओडीसानंतर मध्यप्रदेशात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत, त्यामुळे आता या राज्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार तर आहेच पण सोन्याचे भाव कमी होतील का याचा अंदाजही लोक घेत आहेत. आम्ही सांगतो की, सोन्याचे भाव एक लाखांच्या घरात आताच आहेत, हे पाहता आता सोन्याचे भाव कमी होतील ही शक्यता सोन्याच्या खाणीवरुन स्पष्ट सांगता येत नाही याला आंतरराष्ट्रीय बाजार आणि जागतिक घडामोडीची कारणे महत्वाची असतात, त्यामुळे आगामी काळात सोन्याचे भाव कमी होतील की जास्त हे समजण्यासाठी अवधी लागेल.












Click it and Unblock the Notifications