सोन्याचे पुन्हा आले दिवस! अमेरिकन टॅरिफ स्थगित होताच सोन्याचा भाववाढीचा विक्रम? किती भाव वाढले जाणून
Gold breaks all records, prices rise : सोन्याचे भाव 38 टक्क्यांनी कमी होणार हे काही अहवाल सांगतात, तर काही अहवाल भाव वाढतील हे सांगत आहेत, अशा धुसर स्थितीत सध्या मात्र सोन्याचे दिवस पुन्हा आले असेच म्हणता येईल, कारण सोन्याचे भाव पुन्हा वाढले असून आतापर्यंतचे भाववाढीचे सर्व विक्रम सोन्याच्या दराने तोडले आहेत.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती त्याचे कारण म्हणजे अमेरिकन टॅरिफ लादण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प सरकारने केली होती पण हा टॅरिफ नव्वद दिवस लांबणीवर ट्रम्प सरकारने आता सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत.

सोन्याच्या दरात चढ-उतार
तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. भारतातील सोन्याच्या दरात दररोज थोडेफार चढ-उतार होत आहेत. अशा परिस्थितीत सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची नवीनतम किंमत जाणून घेणे आवश्यक आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा सध्याचा दर काय आहे आणि कोणत्या शहरात सोने स्वस्त किंवा महाग आहे ते जाणून घेऊया.
सोन्याचे आजचे दर किती?
वनइंडिया हिंदीनुसार, आज भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹9,338 प्रति ग्रॅम आहे, 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹8,560 प्रति ग्रॅम आहे आणि 18 कॅरेट सोने (999 सोने म्हणूनही ओळखले जाते)
₹7,004 प्रति ग्रॅम आहे.
'यूएस गोल्ड फ्युचर्स'मध्ये 2.2 टक्क्यांनी वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसली. स्पॉट गोल्ड 1.5 टक्क्यांनी वाढले तर 3,129.33 डॉलर प्रति औंस एवढा आजचा भाव आहे. यूएस सोन्याचे वायदे 2.2 टक्क्यांनी वाढून $3,145.80 प्रति औंस झाले. ऑक्टोबर 2023 नंतर 9 एप्रिल रोजी सोन्याची एकदिवसीय वाढ सर्वात मोठी होती.
किती वाढू शकतात सोन्याचे भाव?
मनी कंट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, मारेक्स येथील विश्लेषक एडवर्ड मीर म्हणाले, विकासदर जर येत्या काळात मंदावला तर व्याजदर कमी होऊ शकतात. यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते.या महिन्याच्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति औंस $3,200 पर्यंत पोहोचू शकतो, असे ते म्हणाले.
25 वर्षात सोन्याच्या किमतीत किती वाढ झाली?
गेल्या 25 वर्षात सोन्याच्या किमतीत 19 पटीने वाढ झाली आहे, ज्यामुळे भारतीय आणि अमेरिकन शेअर बाजारापेक्षा चांगला परतावा मिळतो. म्हणजेच शेअर बाजारापेक्षा चांगला परतावा सोने देत आहे असे तज्ज्ञ सांगतात.
सध्या 2025 हे वर्ष सुरु आहे आणि 25 वर्षांपुर्वी म्हणजेच 2000 मध्ये सोन्याचे 24 कॅरेटचे दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 4,400 रुपये एवढे होते. तर 2020 मध्ये हेच दर 50,000 रुपयांपेक्षा जास्त झाले. तर 2025 मध्ये 10 एप्रिल) रोजी 94 हजारांच्या जवळ पोहचले आहेत.












Click it and Unblock the Notifications