Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गोल्ड एटीएमची कमाल ! आता सोने गोल्ड एटीएम जमा करा आणि तात्काळ पैसे मिळवा, शुद्धतेचं टेंशन संपलं

Gold ATM : जेव्हा आपल्याला एखाद्या मोठ्या गोष्टीची खरेदी करायची असते किंवा आपल्या अडचणीच्या काळात आपण आपल्या घरातील दागिन्याची विक्री करण्याची गरज पडते. त्यावेळी आपण आपल्या घरातील जून दागिने घेऊन ज्वेलर्सकडे जातो. अशावेळी सराफ दुकानदार त्याचे इच्छेप्रमाणे सोन्याचा बट्टा लावून पैसे देतो. अशावेळी आपण ही आपल्या माहिती असताना देखील आपण त्याला काही बोलत नाही. आता समस्यावर तोडगा काढण्यासाठी चीनने एक मोठे पाऊल उचलं आहे.

आता सोने-चांदीची विक्री करण्याकरिता गोल्ड एटीएम मशीन तुमचं काम हलकं करणार आहे. सध्या मशीनची जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे. गोल्ड एटीएम ही एक अत्याधुनिक मशीन आहे, जी सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन आणि विक्री प्रक्रिया स्वयंचलितपणे करते. ही मशीन 3 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे आणि किमान 50% शुद्धता असलेले सोने स्वीकारते. या मशीनद्वारे सोने विकण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक आहे.

Gold ATM

मिडिया रिपोर्टनुसार, सर्वप्रथम ग्राहकांला आपले सोने मशीनच्या ट्रेमध्ये ठेवावे लागते. त्यानंतर मशीन सोन्याला 1200 अंश सेल्सिअस तापमानात वितळवते आणि त्याची शुद्धता आणि वजन तपासते. ही प्रक्रिया साधारणपणे 20 मिनिटे चालते आणि मशीनच्या स्क्रीनवर रिअल-टाइममध्ये दाखवली जाते. शुद्धता आणि वजनानुसार मशीन शांघाय गोल्ड एक्सचेंजच्या रिअल-टाइम किमतीनुसार सोन्याचे मूल्य निश्चित करते. त्यानंतर ग्राहकांने आपले बँक खाते तपशील प्रविष्ट करावे लागतात. त्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या दागिन्याचे पैसे थेट खात्यात जमा होतात. या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही, ज्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत जलद आणि सोयीस्कर आहे.

एका ग्राहकाने 40 ग्रॅम वजनाचा हार या मशीनमध्ये टाकला, ज्याचे मूल्यांकन 785 युआन प्रति ग्रॅम (अंदाजे 92000 रुपये ) इतके झाले. या हाराच्या बदल्यात त्याला 36,000 युआन (सुमारे 4.2 लाख रुपये) इतकी रक्कम मिळाली आणि ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण झाली. या मशीनच्या पारदर्शकतेमुळे आणि जलद सेवेमुळे अनेकजण पारंपरिक सराफांपेक्षा या मशीनला पसंती देत आहेत.

सोन्याच्या किमतींमुळे वाढती मागणी

मिडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे या गोल्ड एटीएमला प्रचंड मागणी आहे. सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्याने अनेकजण आपले जुने दागिने आणि वारसाहक्काने मिळालेले सोने विकण्यासाठी या मशीनकडे धाव घेत आहेत. शांघायमधील ग्लोबल हार्बर मॉलमध्ये ही मशीन सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत चालते, परंतु मागणी इतकी जास्त आहे की रात्री 12 नंतरही कर्मचारी ग्राहकांना मदत करताना दिसतात. मशीनच्या बाहेर लांबच लांब रांगा लागत असून मे महिन्यापर्यंत सर्व स्लॉट्स बुक झाले आहेत.

सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने लोकांमध्ये आपले सोने विकण्याची इच्छा वाढली आहे. या मशीनने लोकांना एक जलद आणि पारदर्शक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या मशीनद्वारे दररोज सुमारे 30 व्यवहार होत आहेत. विशेषतः 50 ते 70 वयोगटातील स्थानिक महिला या मशीनचा सर्वाधिक वापर करत आहेत. या महिला आपले जुने दागिने विकण्यासाठी मशीनकडे येतात, ज्यामुळे त्यांना तात्काळ रोख रक्कम मिळते. काहीजण मशीनद्वारे उपलब्ध दागिन्याची मोफत शुद्धता चाचणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+