अवघ्या 6 मिनिटांत 'या' सरकारी कंपनीकडून मिळेल कर्ज, असे करा रजिस्ट्रेशन

जर तुम्ही झटपट पर्सनल लोन शोधत असाल, पण बँकेत चकरा मारुन कंटाळलेले असाल तर सरकारी कंपनी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) आता फक्त 6 मिनिटांत कर्ज देत आहे. 22 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सेवेचा उद्देश गरजू लोकांना त्वरीत आणि सहजपणे कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे.

आम्ही तुम्हाला ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) )प्लॅटफॉर्मबद्दल संपूर्ण माहिती सांगत आहोत. हा प्लॅटफाॅर्म 31 डिसेंबर 2021 रोजी लॉन्च करण्यात आला आहे. आतापर्यंत देशातील 1000 शहरे प्लॅटफॉर्मशी जोडली गेली आहेत. सर्व बँका आणि वित्तपुरवठादार या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करणार आहेत. ओएनडीसीने गुरुवारीच कर्ज वाटपाची सुविधा सुरू केली आहे, त्यावर पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस ॲप्लिकेशन करता येईल आणि तुमचे कर्ज 6 मिनिटांत मंजूर होईल.

Loan

लोन प्रक्रिया झटपट का होते?

लोन प्रक्रिया लवकर होण्याचे कारण म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पेपरलेस आहे. अर्जदार कोणत्याही फिजकल कागदपत्रांशिवाय त्यांच्या घरून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकतात. या व्यवस्थेमुळे लोनसाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी करते.

लोनसाठी पात्रता

ओएनडीसी क्रेडिट कार्ड, विमा उत्पादने, म्युच्युअल फंड आणि शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी कर्जासह विविध कारणांसाठी ऑनलाइन कर्ज देते. या विस्तृत पर्यायांमुळे समाजातील विविध घटकांना अशा जलद कर्ज सेवांचा लाभ मिळू शकतो.

ऑनलाइन अर्ज कसा करावा

कर्जासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांना काही कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागतात. यामध्ये केवायसी पडताळणीसाठी आधार कार्ड किंवा डिजी लाॅकर, खाते एकत्रित करणारा डेटा, सेटलमेंट हेतूंसाठी आधार वापरून ई-स्वाक्षरी आणि एनएसीएच सह खाते कनेक्शन यांचा समावेश आहे. या आवश्यक कागदपत्रांसह, कोणतीही व्यक्ती घरबसल्या सहजपणे कर्जासाठी अर्ज करू शकते.

नोंदणीकृत कंपन्या

आतापर्यंत नऊ कंपन्यांनी ओएनडीसीकडे नोंदणी केली आहे. यामध्ये आदित्य बिर्ला फायनान्स, टायरप्लेक्स, क्लिनिक360, कर्नाटक बँक, डिएमआय फायनान्स, टाटा डिजीटल, इझी पे, इंडीपे आणि इनव्हाईसपे यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक बँकिंग फायनान्स कंपन्यांशी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी बोलणी सुरू आहेत. यामध्ये आयडीएफसी फर्स्ट बॅंक, मोबिक्विक, रुपीबाॅस, टाटा कॅपिटल, कोटक महिंद्रा बॅंक, सेंट्रल बॅंक आॅफ इंडिया आणि अॅक्सिस फायनान्स यांचा समावेश आहे.

भविष्यातील योजना

कंपनी सप्टेंबरच्या अखेरीस जीएसटी इनव्हॉइसवर कर्ज देण्याची सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांना गरजेच्या वेळी लवकर कर्ज मिळू शकेल. ओएनडीसीचा हा नवीन उपक्रम विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती आणि व्यवसायांसाठी कर्ज मिळवणे सोपे आणि जलद बनवत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+