Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वाह..अदानींचे दातृत्व! मुलाचे लग्न साध्या पद्धतीने करुन गौतम अदानींनी दिले 10 हजार कोटी रुपये दान

Gautam Adani : देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांचे पुत्र जीत अदानी आणि दिवा शाह काल विवाहबंधनात अडकले. या लग्न सोहळ्याची विशेष बाब म्हणजे अनेकांना वाटले होते की, हा सोहळा खूपच शाही पद्धतीने होईल पण उलटपक्षी अदानी परिवाराने हा सोहळा साध्या आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला. यानिमित्ताने गौतम अदानींचे दातृत्व दिसून आले आहे.

मुलाच्या लग्नानिमित्त गौतम अदानी यांनी शाही खर्च टाळून उदार हातांनी देणगी दिली आहे. मुलगाल जीत यांच्या लग्नानिमित्त अदानी यांनी सुमारे 10 हजार कोटी रुपयांची देणगी दिली. त्यांनी दान दिलेल्या या पैशांचा मोठा भाग सामाजिक कार्यावर खर्च होणार आहे.

Gautam Adani

दान दिलेली कुठे होणार खर्च

गौतम अदानी यांनी दान दिलेल्या रकमेतील मोठा भाग हा सामाजिक कार्यात खर्च केला जाणार आहे, यामध्ये आरोग्यसेवा,शिक्षण आणि कौशल्य विकासावर जास्तीत जास्त खर्च केला जाईल, अशी माहिती अदानी यांच्याकडून देण्यात आली आहे.

आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकासावर खर्च होणार

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सामाजिक कार्यासाठी 10 हजार कोटी रुपये देणगी देऊन 'सेवे'ची प्रतिज्ञा केली. त्यांच्या देणगीचा मोठा भाग आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासातील मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांच्या उपक्रमांना निधी देण्यासाठी जाण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमांमध्ये समाजातील सर्व घटकांना परवडणाऱ्या जागतिक दर्जाच्या रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये, परवडणाऱ्या उच्च दर्जाच्या K-12 शाळा आणि खात्रीशीर रोजगारक्षमतेसह प्रगत जागतिक कौशल्य अकादमींचे नेटवर्क उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

मुलाच्या लग्नानंतर अदानी यांची पोस्ट

मुलगा जीत यांच्या लग्नानंतर गौतम अदानी यांनी एक्सवर एक पोस्ट केली त्यात त्यांनी म्हटले की, "सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाने, जीत आणि दिवा आज लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. आज अहमदाबादमध्ये पारंपारिक विधी आणि प्रियजनांमध्ये शुभ मंगल भावनेने हे लग्न पार पडले. हा एक छोटासा आणि अत्यंत खाजगी कार्यक्रम होता, त्यामुळे आम्हाला इच्छा असूनही आम्ही सर्व शुभचिंतकांना आमंत्रित करू शकलो नाही, ज्याबद्दल मी माफी मागतो. मी तुम्हा सर्वांकडून माझ्या मुली दिवा आणि जीतसाठी माझे मनापासून प्रेम आणि आशीर्वाद मागतो."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+